श्रीपाद नाईक यांचे उद्या वेळगे, पर्वरी आणि पणजीत बूथ मेळावे 

0
709
 गोवा खबर:उत्तर गोव्याचे भाजपचे लोकसभा उमेदवार व विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.उद्या 3 ठिकाणी बूथ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
 आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे दौरे व त्यात सर्व मुख्य कार्यकर्ते तसेच मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या. त्यात त्यांना भरघोस प्रतिसाद लाभला होता,अशी माहिती भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यात सर्व मतदारसंघांमध्ये बूथ मेळावे व जाहीर सभा असा कार्यक्रम होणार आहे. उद्या १६ एप्रिल रोजी तीन ठिकाणी बूथ मेळावे होणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता साखळी मतदारसंघातील वेळगे पंचायत परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात पहिला मेळावा  होणार आहे. ६ वाजता पर्वरी मतदारसंघातील गाडगे महाराज सभागृहात तर ७ वाजता पणजी मतदारसंघातील गोमंतक मराठा समाज सभागृहात तीसरा बूथ मेळावा होणार आहे.
या मेळाव्यांना  श्रीपाद नाईक यांच्या सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्थानिक बूथ नेते व पक्षाचे पदाधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.