श्रीपाद नाईक यांचा उद्या मांद्रेत प्रचार दौरा 

0
871
 गोवा खबर:श्रीपाद नाईक यांचा मांद्रे मतदारसंघातील दौरा आज ५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता पेडणे केरी येथून सुरू होणार आहे. श्री रवळनाथ मंदिरात देवदर्शन व परिसरात कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेण्यात येतील. १०.३० वा. पालये येथील श्री भूमिका मंदिर व परिसर, ११.३० वा. हरमल तिटो, १२.३० वा. हरमल येथील श्री नारायण देवस्थान व परिसरात प्रचार करण्यात येईल. 
दुपारच्या सत्रात ३ वाजता मधलामाज मांद्रे येथील शिरोडकर सुपर मार्केटच्या मागील परिसरात लोकांशी संपर्क करण्यात येईल. ४ वाजता मोरजी येथील रावराजे देशप्रभू सामाजिक संकुलात श्रीपाद नाईक कार्यकर्ते व मतदारांना भेटतील. ५. वा. आगरवाडा पंचायत क्षेत्रात प्रचार करतील. ६ वा. पर्से येथे श्री भगवती देवी मंदिर परिसर, ७ वा. तुयें येथे देवी श्री भगवती मंदिर परिसर व शेवटी विर्नोडा येथे कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेण्यात येतील.