श्रीपाद नाईक प्रचारासाठी उद्या ताळगावात

0
698

 

 

गोवा खबर:मंगळवार दि. २ एप्रिल रोजी खासदार श्रीपाद नाईक यांचा प्रचार दौरा ताळगांव मतदारसंघात होणार आहे. प्रचार सकाळी ९ वाजता सांतिनेज येथील आपटेश्वर मंदिरापासून सुरू होईल.

१० वाजता प्रमय माईणकर यांच्या घरी भेट दिल्यानंतर ११ वा. भाटले येथील सटी देवस्थान परिसरातील लोकांच्या भेटी घेतील. दुपारी १२ वाजता चिंचोळे भाटले येथील दत्त मंदिरात दर्शन व त्यानंतर लोकांशी संपर्क करण्यात येईल. १ वा. आमारालवाडा येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील.

दुपारच्या सत्रात ३.३० वा. सायलें भाट येथील लोकांच्या भेटी घेण्यात येतील तर ४.३० वा. शंकरवाडी ताळगांव परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. ५.३० वा. आदर्श सर्कल, टोंक – कारंजाळे पार्क येथे ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेतील. ६.३० वा. एन. आय. ओ. कॉलनी, दोना पावला व शेवटी ७.३० वा. अडवलपालकर कॉलनी, ताळगांव येथील लोकांशी संवाद साधला जाईल.

साळगांव मतदारसंघात श्रीपाद नाईकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मोदी सरकारने देशातील अगदी निम्न स्तरीय लोकांपर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचाव्यात यासाठी गेल्या पाच वर्षांत प्रयत्न केले. मोदी सरकार किंवा त्यांच्या सरकारातील कुणाही मंत्र्याने एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. सगळा पैसा देशाच्या विकासासाठी खर्च करण्यात आलेला आहे. आपणा सगळ्यांचा विकास करणारे, सर्वाना सोबत घेऊन जाणारे सरकार आपल्याला हवे आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा भाजपला मत देऊन सरकार घडवण्यास मदत करण्याचे आवाहन भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी केले.

साळगांव मतदारसंघातील दौऱ्यात वेरें – बेती येथे घेण्यात आलेल्या छोटेखानी बैठकीत श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, स्थानिक सरपंच, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

सकाळपासून सुरू झालेल्या प्रचारात गिरी – वेन्सिओवाडा, संगोल्डा, साळगांव मार्केट, पिळर्ण पंचायत, नेरूल मार्केट, वेरें मार्केट, पी. डी. ए. कॉलनी तसेच घरोघरी भेटी देऊन नाईक यांनी लोकांशी संपर्क साधला. या भेटींमध्ये त्यांनी खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती लोकांना दिली. त्यांच्या दौऱ्यास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.