श्रीपाद नाईक उद्या सांखळीत करणार प्रचार 

0
754
गोवा खबर: खासदार श्रीपाद नाईक उद्या गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी आमोणे येथील श्री  बेताळ देवालयापासून सांखळी मतदारसंघात प्रचार दौऱ्याला सुरुवात करतील.साखळी मतदारसंघातील प्रचरात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील सहभागी होणार आहेत.
श्रीपाद नाईक सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत आमोणे पंचायतीत कार्यकर्ते व लोकांच्या भेटी घेतील.
  १०.३० ते ११.३० पर्यंत नावेली पंचायत क्षेत्रातील श्री रवळनाथ मंदिर व परिसरात लोकांच्या गाठीभेटी घेतील. ११.३० ते १२.३० या दरम्यान सुर्ला येथील श्री सिद्धेश्वर मंदिर व परिसरातील कार्यकर्ते व लोकांच्या भेटी. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत वेळगे येथील श्री सातेरी व श्री महादेव मंदिरे व परिसरात प्रचार करण्यात येईल.
दुपारच्या सत्रात ३.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाळी पंचायत क्षेत्रात प्रथम कोठंबी येथील श्री चंद्रेश्वर मंदिर, त्यानंतर चावडी येथील श्री गणपती मंदिर व भामई येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर व परिसरातील लोकांच्या भेटी घेतील. ५.३० ते ६.३० पर्यंत कुडणे पंचायत क्षेत्रातील श्री कुडणेश्वर मंदिर व परिसर, ६.३० ते ७.३० पर्यंत हरवळे पंचायत क्षेत्र, ७.३० ते ८.३० पर्यंत विर्डी येथे व शेवटी ८.३० ते ९.३० पर्यंत  सांखळी येथे लतारा हॉलमध्ये बैठक घेण्यात येईल.
मुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार डॉ. प्रमोद सावंत हेही त्यांच्या सोबत प्रचारात सहभागी होणार आहेत.