श्रीपाद नाईक उद्या भरणार उमेदवारी अर्ज 

0
1020
 गोवा खबर:  लोकसभा निवडणुकीचे भाजपाचे उत्तर गोवा उमेदवार व विद्यमान खासदार श्रीपाद नाईक उद्या  २९ मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. सकाळी ११ वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात हा अर्ज सादर करण्यासाठी जातील. 
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, सर्व मंत्री,आमदार उपस्थित असणार आहेत.
त्यापूर्वी सकाळी 9 वाजता नाईक हे महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेणार आहेत.
  उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर  नाईक पणजी मतदारसंघात आपला प्रचार दौरा करणार आहेत.
दरम्यान,आज दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,आयुष मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.