श्रीपाद नाईकांना मार्शेलमध्ये मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

0
791
गोवा खबर:उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला असून त्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहे. 
काल सोमवार दिनांक १५ रोजी श्री नाईक यांनी मार्शेल परिसरात कार्यकर्ते व सर्वसामान्य मतदारांच्या भेटी घेतल्या. मार्शेल मार्केट, दुकानदार इत्यादी लोकांना भेटून प्रचार केला. श्रीपाद नाईक यांनी केलेल्या कामांची लोकांनी स्वतःच आठवण करून दिली व त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
प्रचारात माजी सभापती विश्वास सतरकर, खांडोळा-बेतकी पंचायतीचे सरपंच दिलीप नाईक, वेरें-वाघुर्मे पंचायतीचे सरपंच सत्यवान शिलकर, स्थानिक भाजप मंडळ समितीचे पदाधिकारी विनय गावकर, कार्यकर्ते बाबी, ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम फडते, कार्यकर्त्या नेहा चोडणकर, सलील आजगांवकर, वळवई पंचायतीचे सरपंच दिगंबर तारी, उदय कुरी, मोहनदास लवंदे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.