श्रीपाद नाईकांना तिसऱ्या टप्प्यातही डिचोलीत प्रतिसाद

0
1477

 

 

 गोवा खबर:श्रीपाद नाईक यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून काल गुरुवारी डिचोली मार्केट परिसरात लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांना यावेळीही मतदारांनी उदंड प्रतिसाद दिला.

नाईक यांनी काल सकाळच्या वेळेत डिचोली मार्केट परिसरातील दुकानदार, भाजी विक्रेते, जुना बाजार व नवीन मार्केट संकुलातील दुकानदारांना भेट देऊन मत देण्याचे आवाहन केले. त्यांच्या सोबत स्थानिक आमदार राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष सतीश गांवकर, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, बाळू बिर्जे, अन्य नगरसेवक तसेच वल्लभ साळकर, सचिन साळकर, कार्यकर्ते राजेंद्र कडकडे, इत्यादी प्रचारात सहभागी झाले होते.