श्रीपाद नाईकांचा डिचोली मतदारसंघात उद्या प्रचार दौरा

0
954

 

 

गोवा खबर:खासदार श्रीपाद नाईक यांचा शनिवार दि. २३ रोजी डिचोली मतदारसंघात प्रचार दौरा होणार आहे. सकाळी ९ वाजता अडवलपाल येथील श्री शांतादुर्गा मंदिरापासून प्रचाराची सुरुवात होईल. १० वाजता मुळगाव येथे श्री केळबाई मंदिरात देवीच्या दर्शनानंतर गावातील कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेतील.

१०.४५ वा. व्हाळशी येथील देव श्री तळेश्वराच्या दर्शनानंतर कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेतील. ११.१५ वा. डिचोली येथील छ. शिवाजी महाराज सर्कल, ११.३० वा. छ. शिवाजी म. मैदान, ११.३५ वा. डिचोली चर्च, ११.४५ वा. श्री शांतादुर्गा मंदिर गावकरवाडा, १२.३० वा. मुस्लीमवाडा, दु, १.०० वा. भायली पेठ, १.३० वा. लाडफे श्री सातेरी देवस्थान, २.०० वा. श्री भूमिका देवस्थान कासारपाल. २.३० वा. नानोडा.

दुपारच्या सत्रात ४.०० वा. उसप येथील श्री सातेरी देवस्थान, ५.३० वा. श्री माऊली मंदिर, मेणकुरे व संध्या ७.३० वा. श्री भूमिका मंदिर आणि श्री महादेव मंदिर साळ येथे कार्यकर्त्यांच्या भेटी व तद्नंतर कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेतील.