शोभेचे मासे आणि मत्स्यालय विषयावर (अक्वेरियम) प्रशिक्षण

0
670

गोवा खबर : मत्स्यध्य़ोग संचालनालयाने १२ आणि १३ जानेवारी रोजी एला धावजी येथील मच्छिमारी प्रशिक्षण केंद्रात  शोभेचे मासे आणि मत्स्यालय विषयावर (अक्वेरियम) लघू मुदतीच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी ११ जानेवारीपूर्वी संध्या ५.३० वाजेपर्यंत आपले अर्ज संचालनालयात सादर करावे. अधिक माहितीसाठी प्रमुख कार्यालयात दूरध्वनी क्रमांक ०८३२- २२२४८३८ वर संपर्क साधावा किंवा
dir-fish.goa@nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.