शोपियान चकमकीत २ जवान शहीद

0
989

दक्षिण काश्मीर मधील  शोपियान जिल्ह्यात काल रात्रीपासून संरक्षण दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. एका कॅप्टनसह अन्य तिघे या चकमकीत जखमी झाल्याचं वृत्त आहे. सैन्यानेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. चकमक अद्याप सुरूच आहे.

शोपियान जिल्ह्यातल्या झैनापोरा भागात अवनीरा गावात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच सैन्याने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैन्यदलाने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पण या चकमकीत ५ सैनिक जखमी झाले. त्यांना लष्कराच्या ९२ तळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोन जवान शहीद झाले.