शेतकर्‍याच्या उत्पादनाला मार्केट   मिळेल याची खात्री करा :एस ई सी

0
587

गोवा खबर:शेती कामांचा हंगाम  असल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनांना खरेदीदार मिळेल याची कृषी सचिवांनी राज्य मार्केटींग फेडरेशनशी समन्वय साधून खात्री करून देण्याचे आवाहन  राज्य  कार्यकारी समितीने केले आहे.

गोव्याचे मुख्य सचिव  परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रधान सचिव पुनीत गोयल , वाहतूक सचिव  एस. के. भंडारी आणि महसूल सचिव ,  सदस्य सचिव , एसईसी आणि एसडीएमए  संजय कुमार यांच्या उपस्थितीत  राज्य कार्यकारिणी समितीची (एसईसी) 9 एप्रिलला बैठक पार पडली

वित्त सचिव  दौलत ए. हवालदार,  पीसीसीएफ सुभाष चंद्र, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल,आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन, अबकारी आयुक्त  अमित सतीजा,मत्स्यव्यवसाय सचिव  पी. एस. रेड्डी,  पर्यटन  सचिव जे. अशोक कुमार, पंचायत सचिव  संजय ग्रिहार, कायदा सचिव  सी.आर. गर्ग, नागरी पुरवठा सचिव ईशा खोसला, नगरपालिका प्रशासक संचालक डॉ. तारिक थॉमस, सार्वजनीक बांदकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता  यू.पी. पार्सेकर, आणि वीज खात्याचे मुख्य अभियंता  आर. जी. केणी हे विशेष निमंत्रक म्हणून या बैठकीला उपस्थित होते.

राज्यात उपलब्ध 19 कापणी यंत्रापैकी 8 कापणी यंत्र काम सुरु करीत असून पुढील पीक हंगामासाठी बियाणे वितरण केल्याचे कृषी सचिवांनी  यावेळी सांगितले . या कापणी कामासाठी सीमे पलीकडून कुणालाही आणू नये असा निर्देश एसईसीने दिले आहे.

क्वारंटाईन   करण्यात आलेले सर्व लोक सुस्थितीत  आहेत आणि मडगाव रेसिडेन्सीमध्ये 05 आणि गोवा रेसिडेन्सीमध्ये 03  क्वारंटाईन केल्याची माहिती क्वारंटाईन सुविधा   नोडल ऑफिसर यांनी एसईसीला दिली

आजपर्यंत एकूण 3314 परदेशी 19 विमानांमधून आपल्या मूळ देशाकडे रवाना झाले आहेत असे नोडल ऑफिसर यांनी   एसईसीला माहिती दिली

बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सामान्य आहे आणि   जीवनावश्यक   वस्तूंचा पुरेसा साठा कायम आहे असे जिल्हा निरीक्षकांनी माहिती दिली . कुठेही एखाद्या ठिकाणी क्वचित गर्दी दिसून येत असल्याची   माहितीही यावेळी   देण्यात आली.

 सीमेवर देखरेख करण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचार्‍याच्या सोयीसाठी चेक

पोस्टवर योग्यरितीने तंबू  लावून खात्री करण्याचे निर्देश राज्य कार्यकारी समितीने

सार्वजनिक बांधकाम  खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्याला दिले आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार एसबीआयच्या एटीएम-ऑन-व्हील्स एटीएम सुविधा

पुरवित आहेत आणि लवकरच दुसरे एटीएम ऑन-व्हीलही सुरू होईल , अशी माहिती   यावेळी   श्री हवालदार यांनी दिली.