शिवोलीत रशियन चालवत होते ड्रग्सची प्रयोगशाळा;क्राइम ब्रांच कडून दोघांना अटक

0
996
गोवा खबर:विदेशी नागरिक गोव्यात येऊन ड्रग्सचा व्यवहार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.क्राइम ब्रांचने धडक कारवाई करून 2 रशियन नागरीकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.हे रशियन अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतीची लागवड करत होते.शिवाय त्यापासुन अमली पदार्थ बनवण्यासाठी खास लॅब देखील त्यांनी स्थापन केली होती.
हे रशियन ड्रग्स माफिया शिवोली येथील भाड्याच्या जागेत marijuana नावाच्या ड्रग्स बनवण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतीची लागवड करत होते.क्राइम ब्रांचने धाड टाकली तेव्हा त्यांनी 30 किलो वजनाचे ड्रग्स जप्त केले ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 10 लाख रुपये आहे.अटक केलेल्या रशियन ड्रग्स माफियांमध्ये maxim moskichev आणि artem seregin यांचा समावेश आहे.