शिवसेनेने म्हापशातील परप्रांतीय फेरीवाल्यांना हाकलले

0
898
गोवा खबर:गोवा शिवसेनेने आज आक्रमक भूमिका घेत गोवा-मुंबई आणि गोवा-बेळगाव मार्गावर रस्त्याशेजारी बसून फळे व इतर साहित्य विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना हाकलून लावले.
 गणेश चतुर्थी दरम्यान गोवा शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी  जर कुठे रस्त्यालगत परप्रांतीय फेरीवाले आढळले तर शिवसेना त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्याच बरोबर राज्य सरकारकडे  बिगरगोमंतकीय  बेकायदेशीररित्या फेरी लावत असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा प्रसंगी शिवसेना कायदा हातात घेणार ,असा इशारा दिला होता.
चतुर्थी दरम्यान पाऊस असल्याने फेरीवाले नव्हते पण आता परप्रांतीयांनी बेकायदेशीररित्या रस्त्यालगत बसुन वस्तू विकायला सुरुवात केली आहे. त्याची दखल घेत शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवसेना म्हापसा विभाग प्रमुख सुरज नाईक, राज्य सचिव मंदार पार्सेकर, कोषप्रमुख सुरज वेर्णेकर, प्रसिद्धी माध्यम समन्वयक मनोज सावंत आणि शिवसैनिकांनी गोवा मुंबई आणि गोवा बेळगाव महामार्गावरील फेरीवाल्यांना हटवले आणि परत आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.