शिवसेनेच्या राखी नाईक यांचा कुतिन्होंवर पलटवार;शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा

0
1540
गोवा खबर:सांगे अल्पवयिन विनयभंग प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे.पीडितेच्या आईची ओळख जाहिर केल्या बद्दल महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात शिवसेना, भाजप,रणरागीणी, सवेरा यांनी तक्रारी करून मोर्चा खोलल्या नंतर कुतिन्हो यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सगळ्यावर जोरदार आरोपाच्या फैरी झाड़ल्या होत्या.आज शिवसेनेच्या वतीने उपाध्यक्ष राखी नाईक यांनी कुतिन्हो यांच्यावर जोरदार पलटवार केला.
सांगेतील अल्पवयिन विनयभंग प्रकरणात अल्पवयिन मुलीच्या आईची भेट घेतल्या नंतर चमकोगीरी करण्यासाठी स्वतः प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी एका मीडिया ग्रुप वर फोटो आणि पोस्ट टाकून त्या पीड़ित युवतीच्या आईची ओळख जाहिर केलेली आहे.कुतिन्हो यांनी गंभीर चूक केल्या नंतर इतरांनी ती दाखवल्या नंतर अडचणीत सापडल्या मूळे कुतिन्हो यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पीडीतेच्या आईचे प्रतिज्ञापत्र ढाल म्हणून वापरणे सुरु केले आहे.काम कमी आणि प्रसिद्धि जास्त अशी ख्याती असलेल्या कुतिन्हो यांनी विनाकारण चालवलेली राजकीय चिखलफेक थांबवली नाही तर त्याला शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी प्रभुदेसाई नाईक यांनी दिला आहे.
नाईक म्हणाल्या,सांगे प्रकरणातील संशयित पोलिसांच्या ताब्यात असून सध्या कोलवाळ तुरुंगाची हवा खात आहे.नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई यांनी आपल्या राजकीय फ़ायद्यासाठी कुतिन्हो यांना बोलावून घेतले.मात्र त्यानंतर झालेल्या प्रकरणामूळे कुतिन्हो अडचणीत सापडल्या आहेत.प्रसिद्धिची हौस त्यांना चांगलीच महागात पडली आहे.
बाहेरुन येऊन राहणाऱ्यांची पडताळणी व्हायला हवी अशी मागणी करणाऱ्या कुतिन्हो यांनी बोगस कागदपत्र सादर करून नेत्रावळीत राहत असल्याचे दाखवणाऱ्या अभिजीत देसाई यांचा विषय देखील हाती घ्यावा असा खोचक सल्ला नाईक यांनी यावेळी कुतिन्हो यांना दिला.
कुतिन्हो यांनी एनजीओवर सरसकट टिका करून चांगले काम करणाऱ्या लोकांचा अपमान केला आहे.त्यासाठी कुतिन्हो यांनी सगळ्याची माफी मागायला हवी अशी मागणी देखील नाईक यांनी यावेळी केली.
शिवसेना कुठलेही विषय व्यक्तिगत पातळीवर घेत नाही तर सामाजिक हित लक्षात घेऊन प्रश्न सूटे पर्यंत त्याचा पाठपुरावा करते ही गोष्ट कुतिन्हो यांनी लक्षात ठेवावी असे नाईक यांनी सांगितले.
कूतिन्हो यांनी पीडीत मुलीला न्याय देण्याच्या नावाखाली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयन्त केला तर शिवसेना आपल्या पद्धतीने त्याचा समाचार घेतल्या शिवाय राहणार नाही,असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.