शिवसेनेच्या दक्षिण गोवा विद्यार्थी विभाग प्रमुखपदी कुडतरकरची नियुक्ती

0
2174
संकेत कुडतरकर याला दक्षिण जिल्हा विद्यार्थी विभाग प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र देताना शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत. सोबत युवा विभाग प्रभारी अमोल प्रभुगावकर, विद्यार्थी विभाग प्रभारी चेतन पेडणेकर आणि विद्यार्थी विभाग प्रमुख मंथन रंकाळे.
गोवा खबर:केपे सरकारी महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थी संकेत कुडतरकर याची शिवसेना विद्यार्थी विभाग दक्षिण जिल्हा प्रमुखपदि नेमणूक करण्यात आली. कुडतरकर हा विद्यापीठ निवडणुकीत सक्रिय असून दक्षिण गोवा जिल्ह्यातील प्रभावशाली विद्यार्थी नेता म्हणून सुपरिचित आहेत. संकेत याच्या नेमणुकीमुळे दक्षिण गोव्यात शिवसेना विद्यार्थी विभाग आणखी मजबूत होणार असल्याचे मत विद्यार्थी विभाग प्रमुख मंथन रंकाळे यांनी व्यक्त केले आहे.
 शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या हस्ते संकेत याला नियुक्ती पत्र देण्यात आले. राज्य सचिव आणि  युवा विभाग प्रभारी अमोल प्रभुगावकर, विद्यार्थी विभाग प्रभारी चेतन पेडणेकर आणि विद्यार्थी विभाग प्रमुख मंथन रंकाळे यावेळी हजर होते.