शिवसेनेचे कार्य लोकांच्या हृदयाला भीडणारे:रमेश नाईक

0
1537
गोवा खबर:52 व्या वर्धापन दिनाचे औचित्य राखून शिवसेनेच्या वतीने शंभरहुन अधिक महिलांना नेत्रावळी येथे आयोजित कार्यक्रमात साडया आणि छत्र्यांचे वाटप रविवारी करण्यात आले.
समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान महत्वाचे असते.त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी प्रभूदेसाई नाईक यांच्या पुढाकाराने सांगे तालुक्यातील शंभरहुन अधिक महिलांना नेत्रावळी येथे साडया आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे माजी राज्य प्रमुख रमेश नाईक प्रमुख पाहुणे तर विद्यमान राज्यप्रमुख जितेश कामत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाला राज्य सचिव मंदार पार्सेकर, वंदना लोबो,दक्षिण गोवा प्रमुख अलेक्सी फर्नांडीस, उत्तर गोवा जिल्हा प्रमुख किशोर राव,बूथ विस्तार समिती प्रमुख राजू विर्डिकर, केपे तालुका प्रमुख संजय देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने  कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी शिवसेना राज्यप्रमुख रमेश नाईक म्हणाले,शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झटत आहे.महिलांनी संघटीत होऊन समाजाच्या हितासाठी योगदान देणे सुरु ठेवले तर शिवसेना त्याला पूर्ण ताकदिने साथ दिल्या शिवाय राहणार नाही.
नाईक यांनी सांगे पोलिसांकडून अमित नाईक यांना दिलेल्या अमानुष वागणूकीचा तीव्र शब्दात निषेध केला.यापुढे सांगे पोलिसांकडून असे प्रकार झाले तर ते बिल्कुल खपवून घेतले जणार नाहीत.सांगे पोलिसांच्या कारनाम्यांमुळे स्थानीकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून सांगे पोलिसांचा कारभार सुधारला नाही तर लोक अजिबात गप्प बसणार नाहीत ,असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.
सर्वसामान्य लोकांचे कल्याण साधणे हे शिवसेनेचे आद्य कर्तव्य असून आजचा कार्यक्रम त्याचाच भाग असल्याचे सांगून कामत म्हणाले,अनेक प्रश्नांनी आज लोक त्रस्त असून त्यातून सुटका हवी असेल तर शिवसेने शिवाय पर्याय नाही.सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांचा विसर पडला आहे.लोकांचे जीवन सुधरावे असे आताच्या राज्यकर्त्यांना वाटत नाही हे दुर्दैव आहे.सांगे मतदार संघातील रस्ते बघितले तर सरकार नेमके काय पद्धतिचे काम करत आहे हे कळून येईल.
कार्यक्रमाच्या आयोजक राखी प्रभुदेसाई नाईक म्हणाल्या, महिला या समाजाच्या जडणघडणीतील मुख्य घटक आहे.भावी पीढीचे भवितव्य घडवण्याचे काम महिला करत असतात.त्यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजाची सेवा अखंडपणे आणि पक्ष विरहित चालू ठेवण्यासाठी स्वाभिमान ही स्वयंसेवा संस्था आपण स्थापन केली असून सगळ्यांनी त्याला सहकार्य करून समाज घडवुया असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले.
दक्षिण गोवा प्रमुख फर्नांडिस म्हणाले,नाईक यांच्या मूळे दक्षिण गोव्यात पक्षाची ताकद वाढली आहे.नाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विषयांवर निर्भिडपणे आवाज उठवून पक्षाचे काम पुढे नेले असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शिवसैनिक तयार आहेत’