शिरोडा मतदार संघात भाजपाचा विजय निश्चित : क्रिस्तेव कॉस्ता

0
1507
 गोवा खबर:येत्या पोटनिवडणुकीत शिरोडा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार भरघोस मतांनी जिंकतील यात शंका नाही, असे प्रतिपादन शिरोडा भाजपा मंडळाचे  सदस्य व पंचवाडी ग्रामपंचायतीचे  पंच  सदस्य  मिस्टर क्रिस्तेव कॉस्ता यांनी पंचवाडी पंचायत प्रभागातील दिगास बादेगाळ येथे  सुभाष शिरोडकर यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी उपस्थित जनसमुदाय समोर बोलताना केले. 
 शिरोडकर यांनी शिरोडा मतदार संघाचा नियोजन बद्ध विकास केला आहे. पुढे ज्या समस्या या मतदार संघात असतील त्या सोडवण्यासाठी त्यांची  या मतदारसंघास गरज आहे. लोकांनी विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता शिरोडकर यांना निवडून आणणे अत्यंत गरजेचे असल्याचे कॉस्ता म्हणाले.
 विरोधक सध्या ना ना तऱ्हेच्या अफवा पसरत असून हे फक्त त्यांना पराभव समोर दिसू लागल्याने ते करीत आहेत,असे सांगून कॉस्ता म्हणाले, शिरोडा मतदार संघातील मतदार सुजाण असून ते अशा संधिसाधु राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देतील.
 यावेळी पंचवाडी पंचायतीचे माजी पंच सदस्य  जुवावं ब्रागांझा, भाजपा उमेदवार श शिरोडकर व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिरोडा मतदार संघाचा विकास हेच ध्येय नजरेसमोर ठेवून गेली कित्येक वर्षे आपण काम करतो व त्याचे फळ म्हणून समाजसेवा आपल्या हातून घडत आहे. आपले विरोधक नाहक अफवा पसरवून मतदारांची दिशाभूल करीत असून शिरोडा मतदार संघाचे मतदार यावेळी भाजपा उमेदवारास विजयी करतील. तसेच लोकसभेसाठी सुद्धा गोव्यातून दोन्ही उमेदवार विजयी होऊन केंद्रात भाजपाचे हात बळकट करतील यात शंका नाही, असा विश्वास शिरोडकर यांनी व्यक्त केला. “भाजपाचा प्रचार हा मतदारांच्या गाठभेठी व कोपरा बैठका यांच्यावर भर देणारा आहे. शिरोडा मतदार संघाच्या ज्या समस्या  प्रचार दरम्यान आपल्यापुढे लोकांनी मांडल्या त्या सोडवण्याच्या सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल पण त्या करीता आपले सहकार्य अपेक्षित आहे,असे शिरोडकर यांनी पुढे सांगितले.