शिरोडा मतदार संघातून शिरोडकर यांचा विजय निश्चित: सुरज नाईक 

0
708
गोवा खबर:शिरोडा मतदार संघातील मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता भाजपाचे उमेदवार  सुभाष शिरोडकर यांचा विजय निश्चित आहे शिरोडकर यांनी शिरोडा मतदार संघाचा गेल्या २४ वर्षात केलेला नियोजनबद्ध विकास व राजकारणात राहून केलेले समाजकारण, मतदारांशी असलेला दांडगा संपर्क हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
केवळ तेच शिरोडा मतदार संघाचा नियोजनबद्ध रीतीने विकास करू शकतात. २०१७ च्या निवडणुकी नंतर त्यांच्या अथक परिश्रमामुळे शिरोडा मतदार संघात ३० कोटींची कामे पूर्णत्वास आली. त्याचे श्रेय हे केवळ  शिरोडकर यांनाच जाते. विरोधक केवळ अफवा पसरत असून शिरोडा मतदार संघाचा विकास झाला नाही अशी गरळ ओकत असून लोकांची मने कलुषित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. पण शिरोडा मतदार संघातील मतदार सुजाण असून ह्या भूलथापांना बळी पडणार नाहीत.या पोटनिवडणुकीत  शिरोडकर प्रचंड बहुमताने निवडून येतील असा दावा भाजपा मंडळ शिरोड्याचे अध्यक्ष  सुरज नाईक यांनी शिरोडकर यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान घरोघर भेटी देतांना बेतोडा-निरंकाल भागात व्यक्त केला आहे.
 यावेळी भाजपा उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या बरोबर  सुरज नाईक, बोरी जिल्हा पंचायत सदस्य  दीपक बोरकर, बेतोड्याचे माजी सरपंच  अशोक नाईक व कार्यकर्ते हजर होते.
आपल्या भाषणात  शिरोडकर म्हणाले, ‘विरोधक केवळ आपल्यावर नको असलेले आरोप करतात पण आपण केवळ मतदारसंघाचा विकास व्हावा ह्या दृष्टीने भाजपात प्रवेश केला. गेली कित्येक वर्षे आपले कार्यकर्ते हे निस्वार्थपणे कार्य करतात. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून आपल्याला लोकांचे प्रेम मिळते व यावेळीही ते मिळणार आहे.त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.