शिरोडयात उद्या भाजपच्या जाहीर सभेचे आयोजन

0
1100
गोवा खबर:भाजपतर्फे येथील उद्या 20 एप्रिल रोजी सायंकाळी शिरोडयाचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरोडा मतदारसंघात सुभाष शिरोडकर यांनी आपल्या हजारो समर्थकांना सोबत घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यासह स्थानिक पंच सदस्य शिरोडकर यांच्या प्रचारात सहभागी होऊन जोरदार प्रचार करत आहेत.
कराय-शिरोडा येथील डॉ. सखाराम गुडे आरोग्य केंद्रा समोरील नेताजी सुभाष चंद्र बोस स्टेडियम मध्ये उद्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे उमेदवार नरेद्र सावईकर,शिरोडयाचे उमेदवार सुभाष शिरोडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.सभेची जय्यत तयारी सुरु असून जास्तीत जास्त लोक या सभेस उपस्थित असतील,असे शिरोडा मतदार संघ प्रभारी दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले आहे.