गोवा खबर:शिरोडा मतदारसंघाच्या प्रश्नांची सुभाष शिरोडकर यांना चांगली जाण आहे.शिरोडयाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिरोडकर यांना बहुमताने निवडून द्या.तसेच आघाडीत सहभागी होऊन पाडण्यासाठी कारस्थाने करणाऱ्या मगोच्या उमेदवाराला कायमचा धडा शिकवून अद्दल घडवण्याची संधी शिरोडावासीयांसाठी 23 एप्रिल रोजी चालून आली आहे,त्याचे सार्थक करा,असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी वाजे-शिरोडा येथे झालेल्या कोपरा बैठकीत केले.

यावेळी भाजप शिरोडा मंडळ अध्यक्ष सूरज नाईक,भाजप प्रवक्ता दत्तप्रसाद नाईक यांच्या सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरोडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी आज दिवसभर शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत बोरी पंचायत क्षेत्रात घरोघरी जाऊन प्रचार केला.सकाळच्या सत्रात कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी बेतोडा परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला.नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना शिरोडयाच्या जनतेने घरचा रस्ता दाखवावा,असे आवाहन गावडे यांनी यावेळी केले.
सायंकाळी सुभाष शिरोडकर यांनी आपल्या हजारभर समर्थकांच्या जोडीने बोरीतील नवदुर्गा मंदिर ते मुख्य रस्त्यावर प्रचार फेरी काढली.
रात्री झालेल्या वाजे-शिरोडा परिसरातील 3 कोपरा सभांमध्ये शिरोडकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर शिरोडावासीयांनी आपल्याला विजयी करावे असे आवाहन केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आघाडी मध्ये राहून मगोचे ढवळीकर बंधू आघाडी सरकार विरोधात कशी कारस्थाने रचित होते याची माहिती देत असल्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मतदारांनी थारा देऊ नये, असे आवाहन केले.
