शिगमोत्सव कार्यक्रमात सतर्कता बाळगण्याचे सरकारचे आवाहन

0
548

 गोवा खबर:सरकारने १० ते २४ मार्चपर्यंत एकूण १६ ठिकाणी शिगमोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यास मान्यता दिली होती. या मिरवणूकीस मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.

जगातील सुमारे १०० देशात आता करोना व्हायरसची प्रकरणे सापडली आहेत आणि त्याचा प्रसार जगात सर्वत्र जलदगतीने होत आहे त्यासाठी हा रोग होऊ नये म्हणून लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय हाती घ्यावे आणि पर्यटकांपासून सतर्क रहावे आणि सरकारने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.