शिक्षण क्षेत्रातील काँग्रेसची धोरणे आठ वर्षे भाजपने चालू ठेवली हिच दिगंबर कामतांच्या कारकिर्दीची फलश्रृती: प्रतिभा बोरकर

0
375
गोवा खबर : ८८ खाण लिजांच्या बिळांत दडुन बसलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर विद्यमान सरकारने लोकायुक्तांचा अहवाल फेटाळल्याचे जाहिर केल्यानंतर बाहेर पडले असून त्यांना कंठ फुटला आहे. भाजप सरकारच्या उपकाराची परतफेड म्हणुन त्यांनी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यावर बेताल आरोप केले आहेत,असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया सेल प्रमुख प्रतिभा बोरकर यांनी केला आहे.
बोरकर म्हणाल्या,दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात घेतलेले धोरणात्मक निर्णय मागील आठ वर्षे भाजप सरकार राबवत आहे, हिच कामत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीची फलश्रृती आहे . पार्सेकरांनी ती लक्षात ठेवावी.
काल गोव्यातील दहावीच्या परीक्षे संबंधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पार्सेकर यांनी केंद्रिय गृह मंत्रालयाने दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे अध्यादेश वा कायदा नव्हे असे वक्तव्य करुन, केंद्रिय गृह मंत्री अमित शहा यानांच एकप्रकारे आव्हान दिले आहे,याकडे बोरकर यांनी लक्ष वेधले आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या कारकिर्दीत जाणकारांची मते घेवुनच सर्व धोरणात्मक निर्णय घेतले होते,असे सांगून बोरकर म्हणाल्या, आज माध्यम प्रश्नावर  कामत यांचेच धोरण भाजप सरकारने मागील आठ वर्षे चालु ठेवले आहे. माध्यम प्रश्नावर पार्सेकरांनी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारने कुठे व का दडपुन ठेवला हे त्यांनी  सांगावे.
बोरकर म्हणाल्या,गोव्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेऊन माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नामवंत शास्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली  नेमलेल्या समितीच्या “गोवा व्हिजन -२०३५” अहवालाची भाजपने अजुनही अमंलबजावणी केली नाही हे दुर्देवी आहे.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवताना, आपल्या कारकिर्दीकडे डोकावुन पहावे, व हिम्मत असल्यास ८८ खाण लिज नुतनीकरण सबंधी  लोकायुक्तानी शिफारस केलेली चौकशी करण्याची सरकारकडे मागणी करावी,असे आव्हान देखील बोरकर यांनी दिले आहे.