शाळेच्या पहिल्या दिवशी पावसाची हजेरी

0
993
 गोवा खबर:दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजल्या. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांची पावले शाळा-विद्यालयांच्या दिशेने आज वळली. आज पहाटे पाऊस सुरु झाल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांची एकच धांदल उडाली. 

 शाळेचा पहिला दिवस असल्याने आज काही शाळा लवकर सोडण्यात येणार आहेत. नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके, पाट्या घेऊन विद्यार्थ्यांनी  शाळेत हजेरी लावली आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्सूनपूर्व पावसाने वाजत गाजत हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला असून विद्यार्थी आणि पालकांना पहिल्याच दिवशी रेनकोट आणि छत्र्या घेऊन शाळेत यावे लागले आहे.काल पावसाचे कोणतेच चिन्ह नव्हते.आज पहाटे अचानक पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थी आणि पालकांची एकच धांदल उडाली..