शालेय विद्यार्थ्यांनी साकारली गांधी प्रतिमा

0
847
default

 गोवा खबर:महात्मा गांधींच्या 150 व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्या प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींची प्रतिमा साकार केली होती. सुमारे एक हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

ड्रोन कॅमेऱ्याने हे विहंगम दृश्य चित्रीत करण्यात आले. ‘फिट इंडिया’ मोहिमे अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी ‘प्लॉग रन’ मध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.