शांताराम नाईक प्रदेशाध्यक्षपदी कायम

0
1405
गोवा खबर : अखिल भारतीय काॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष  हेच यापुढे कायम असतील असा निर्णय आज घेतल्याने काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक हे आपल्या पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय काॅग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी पत्रक काढून वरील माहिती दिली आहे.
 संघटनात्मक निवडणूका होईपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे.