शांतता आणि सुरक्षेसाठी सागरी क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्याची आवश्यकता- निर्मला सीतारमन

0
1040

 

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते दोन दिवसीय सागरी परिषद-2017 चे उदघाटन

पणजी:संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज आयएनएस मांडवी येथे होत असलेल्या दोन दिवसीय सागरी-परिषद 2017 चे उदघाटन केले. आपल्या बीजभाषणात त्या म्हणाल्या की, समविचारी राष्ट्रांनी सामुहिक प्रयत्नांच्या माध्यमातून भारतीय महाद्वीपात नव्याने उदभवणाऱ्या धोक्यांना आटोक्यात आणण्याची आवश्यकता आहे. तसेच या परिषदेच्या निमित्ताने सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय करता येईल यावर सर्वांची मते जाणून घेता येतील, असे त्या म्हणाल्या. भारतीय महाद्वीपामध्ये जागतिक भवितव्य बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपसांमध्ये राजकीय आणि आर्थिक संवाद प्रस्थापित झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

काही देशांच्या धोरणांमध्ये असलेली अपारदर्शकता आणि संदिग्ध वर्तणूक यामुळे देशा-देशांमधील संबंधांमध्ये विश्वासर्हता निर्माण होत नाही. भूभागावर सीमाविषयक प्रश्न जे वसाहतवादाकडून वारशाने मिळाले आहेत, त्यांच्यामुळेही संबंधांमध्ये बाधा निर्माण होते. तसेच भिन्न विचारसरणी, राजकीय अस्थैर्य, आर्थिक निर्भरता, तांत्रिक निर्भरता, भौगोलिक मर्यादा या बाबी देशांमध्ये संबंध प्रस्थापित होण्यास कारणीभूत ठरतात, असे त्या म्हणाल्या.

 

गोवा सागरी परिषदेमध्ये सागरी सुरक्षा आव्हाने, भारतीय महासागरात संवादावर भर देऊन मतभेद दूर करणे, यावर परिषदेत उहापोह करावा, असे संरक्षणमंत्र्यांनी सुचवले.

 

गोवा नाविक युद्ध महाविद्यालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. सकाळच्या सत्रात ऍडमिरल (निवृत्त) अरुण प्रकाश, श्रीलंकेचे ऍडमिरल (निवृत्त) डॉ जयनाथ कोलोम्बगे, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ ऍशले टेलीस यांनी पहिल्या सत्रात सादरीकरण केले.

 

या परिषदेला भारतबांग्लादेशइंडोनेशियामालदीवमलेशियामॉरीशसम्यानमारसेशल्ससिंगापूरश्रीलंका आणि थायलंड या देशांच्या नौदल प्रमुखांची उपस्थिती असणार आहे.