शहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप

0
1116

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोल्याचे जवान सुमेध गवई यांच्या पार्थिवावर लोणाग्रा या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.गवई यांच्या सन्माणार्थ बंदुकीच्या फैऱ्या झाडण्यात आल्या. ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जयहिंद’ आणि ‘सुमेध गवई अमर रहें’च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. गवई यांच्या अंतिम संस्काराला पंचक्रोशीतील हजारो गावकरी उपस्थित होते.

गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. १ ऑगस्टला सुमेध यांचा वाढदिवस झाला. लवकरच ते सुट्टीवर गावी येणार होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सुमेध यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच, तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण हातरून येथे झाले होते.