शस्रे पोलिस स्थानकात जमा करण्याचा आदेश

0
861

गोवा खबर:पोटनिवडणुकीच्या अनुशंगाने उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍याने उत्तर गोव्यातल्या सगळ्या परवानाधारक शस्रधारकांनी आपली शस्रे दि. १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आपल्या संबंधीत क्षेत्रातल्या नजिकच्या पोलिस स्थानकात जमा करण्याचा आदेश दिला आहे.

निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मतमोजणी झाल्यानंतर पाच दिवसा नंतर जमा केलेली शस्रे परवानाधारकांना परत करण्यात येतील. निवडणुकीच्या काळात शस्रे, बंदुका,आणि घातक शस्रे जवळ बाळगण्यास बंदी असेल. निवडणूक प्रक्रिया मुक्त, शांततापूर्ण आणि सुरळीत वातावरणात घेण्यास आणि कायदा आणि सुव्यवस्ता राखण्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.

          कुठल्याही व्यक्तिला किंवा त्याचे कुटुंब किंवा मालमत्तेस खरोखरच धोखा असल्यास तसे पोलिस महासंचालकांना कळवून आवश्यक ती  पोलिस सुरक्षा देण्याची मागणी करावी. पण कुठल्याही परिस्थितीत किंवा उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्‍याकडून परवानगी घेतल्या शिवाय शस्रे जवळ बाळगण्यास मिळणार नाहीत.

          ही बंदी कामावरील लोक सेवक, पोलिस, सैन्य अधिकारी, सुरक्षा अधिकारी, नॅशनल रायफल संघटनेचे सदस्य असलेले खेळाडू आणि ज्या समाजातील सदस्यांना परंपरेने चालत आलेला कायदा,रितीरिवाजाप्रमाणे शस्रे प्रदर्शित करण्याची परवानगी आहे त्यांना ही बंदी लागू नाही, पण त्यांनी हिंसात्मक घटनांत दोशी असू नये किंवा कायदा- सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या कामात धोखा असू नये.