व्हॉल्वो पेंटाने केला पृथ्वीची ऐतिहासिक परिक्रमा करणाऱ्या भारतीय नौदलातील स्त्रियांच्या पथकाचा सत्कार

0
2796

 

गोवा खबर:व्हॉल्वो पेंटा या इंजिन्सचा पुरवठा करणाऱ्या तसेच जलवाहतूक आणि औद्योगिक उपयोजनांसाठी संपूर्ण पॉवर सोल्युशन्स देणाऱ्या कंपनीने ‘नाविका सागर परिक्रमा’ ही मोहीम पूर्ण करून आलेल्या नौदलातील स्त्रियांच्या पथकाचा सत्कार केला. या मोहिमेद्वारे भारतातून प्रथमच पूर्णपणे स्त्रियांचा समावेश असलेल्या पथकाने पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्या आयएनएसव्ही तारिणीला व्होल्वो पेंटा इंजिनचीच शक्ती लाभली आहे.

लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील हा आठ महिन्यांचा प्रवास महिला नौदल अधिकाऱ्यांच्या निश्चय व धैर्यावर शिक्कामोर्तब करणारा होता. ही मोहीम ६ टप्प्यांमध्ये पार पाडली आणि आयएनएसव्ही तारिणीने २१,००० समुद्री मैलांचे अंतर या प्रवासात कापले. पथकाने ५ देशांना भेटी दिल्या, दोनदा विषुववृत्त ओलांडले, ४ खंडातील ३ महासागरांतून प्रवास केला आणि ३ विशाल भूशिरे- लीउविन, हॉर्न आणि गुड होप त्यांना प्रवासात लागली.

जलवाहतुकीच्या क्षेत्रात व्होल्वो पेंटाने दीर्घकाळ काम केले आगे आणि व्होल्वो ओशन रेसमध्ये अनेकदा सोबत केली आहे. जलवाहतुकीच्या क्षेत्रात १०० वर्षांहून अधिक अनुभव असलेले व्होल्वो पेंटा D5 मरिन इंजिन आयएनएसव्हीमध्ये वापरणे ही उत्कृष्ट निवड होती. सामान्य प्रवासात तसेच कसोटीच्या क्षणांना या इंजिनने सर्वोत्तम कामगिरी केली. व्होल्वो पेंटा डीफाइव्ह इंजिन ४.८ लिटर्सचे ऊर्जा विस्थापन (डिसप्लेसमेंट) करते आणि इन-लाइन फोर सिलिंडर कन्फिगरेशनने युक्त आहे.

सत्कार समारंभात व्होल्वो पेंटा इंडियाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख मिरॉन थॉम्स म्हणाले,

या मोहिमेशी संबंध असणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा अत्युत्कृष्ट उपक्रमाला शक्ती पुरवताना, आमची इंजिन्स श्रेष्ठ दर्जाची आहेत आणि जलवाहतूक सुरक्षितततेच्या सर्व मानकांची पूर्तता करणारी आहेत याची खात्री आम्ही करतो. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील कंपनी म्हणून आम्ही इंधनकार्यक्षम उत्पादने तर तयार करतोच, शिवाय आपले महासागर स्वच्छ करण्यासही बढावा देतो. हा संबंध असाच सुरू राहील आणि आमचे कौशल्य भविष्यकाळातही अशा रोमांचक मोहिमांसाठी उपयोगी पडेल, अशी आशा वाटते.

व्होल्वो ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमल बाली म्हणाले,

“संपूर्ण भारतासोबत व्हॉल्वो समुहालाही नौदलाच्या महिला पथकाचा आणि त्यांनी या ऐतिहासिक तसेच महत्त्वपूर्ण प्रवासाद्वारे जे साध्य केले त्याचा अभिमान वाटतो. या महिला दर्यावर्दींनी धैर्य, निश्चय आणि उत्कट आवड देशभरात लक्षावधी स्वप्ने निर्माण करू शकते. या प्रवासात सहभाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल व्होल्वोला खरोखर अभिमान वाटतो. ही बातमी आमच्या स्वत:च्या समूहातील सर्वांना सांगण्यासही आनंद वाटतो. कारण, आमच्या क्षेत्रात स्पर्धात्मक राहताना आम्ही स्त्रिया, वैविध्य आणि सर्वसमावेशकतेला खूप महत्त्व देतो. अशा घटनांमुळे आमच्या तत्त्वांना अधिक बळ मिळते.”