व्हेंटीलेटर्स खरेदीसाठी एस.जे.व्ही.एन लिमिटेड देणार 1 कोटी रुपयांचे पाठबळ

0
661

गोवा खबर:जगभरात थैमान घालत असलेल्या कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी सतलज जल विद्युत निगम मर्यादित (एस.जे.व्ही.एन लिमिटेड) या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत मिनिरत्न सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. कोरोनाच्या संकटसमयी या  केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे तत्वतः मान्य केले आहे.

सिमल्यातील इंदिरा गांघी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी 6 व्हेंटीलेटर्स, तांडा येथील डॉ. राजेंद्रप्रसाद वैद्यकीय महाविद्यालयासाठी 5 व्हेंटीलेटर्स आणि खांदेरी येथील रामपूर रुग्णालयासाठी काही व्हेंटीलेटर्स पुरवण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती  एस.जे.व्ही.एन लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नंदलाल शर्मा यांनी दिली. या आरोग्य संस्थांना मास्क्स, सॅनिटायझर्स आणि ग्लव्ज खरेदी करण्यासाठी लागणारी अधिकची आर्थिक मदतही ही कंपनी करणार आहे.