व्हीएमएसआयआयएचईच्या विद्यार्थ्यांनी घेतला पोर्तुगालमध्ये पाककलेचा अनुभव

0
889

 

 

~व्हीएम साळगावकर आंतरराष्ट्रीय आतिथ्य शिक्षण संस्थेचे (व्हीएमएसआयआयएचई) 12 विद्यार्थी पोर्तुगालच्या सशक्त संस्कृती, परिसर व वारसाचा अनुभव घेण्यासाठी व अन्वेषणासाठी 4 आठवड्यांच्या पोर्तुगाल दौऱ्यावर गेले~

 

 गोवा खबर:व्हीएम साळगावकर आंतरराष्ट्रीय आतिथ्य शिक्षण संस्थेचे 12 विद्यार्थी पोर्तुगालच्या सशक्त संस्कृती, परिर व वारसाचा अनुभव घेण्यासाठी व अन्वेषणासाठी 4 आठवड्यांच्या पोर्तुगाल दौऱ्यावर गेले. हा त्यांच्या गेस्ट्रोनोमी व मद्याच्या ज्ञान वृद्धींगत कार्यक्रमाचा भाग होता. पोर्तुगालच्या भूप्रदेश आणि वारसाचा अनुभव घेताना त्यांनी पाककृती संस्कृतीत अंतर्दृष्टी प्राप्त केली.

व्हीएमएसआयआयएचईचे विद्यार्थी आचारी सबेस्टीयन ब्रिटींगर व आचारी प्रिती साडेकरसह पोर्तुगालला गेले होते. हे आचारी अलीकडेच विद्यार्थ्यांना लेक्चर, तज्ञांद्वारे मास्टरक्लास व आउटडोअर ट्रीपच्या सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय आतिथ्यच्या परिस्थितीचा अनुभव घेता आला. टुरिझमो द पोर्तुगालच्या सहकार्यने व्हीएमएसआयआयएचईच्या विद्यार्थ्यांना पोर्तुगालच्या पाककृती, मद्य, तिकडची संस्कृती व संस्कृती भागांबद्दल अनुभव घेण्याची संधी मिळाली.

पोर्तुगालला भेट देण्यावेळी विदर्थ्यांना त्यांच्या पाककृती वारस्यासहीत तिकडच्या विशिष्ट अन्नप्रकाराबद्दल माहिती देण्यात आली होती. ‘फिओस द ओवोस’ किंवा ‘पोर्तुगीज एग थ्रेड’ हा पास्तासारखा पातळ तयार केला जातो. त्यानंतर तो साखरेच्या सिरपमध्ये शिजवला जातो. तो पोर्तुगीज व ब्राझिल यांच्या पाककृतीतला अविभाज्य घटक आहे. हा पदार्थ तिकडचा प्रसिध्द पदार्थ आहे व तो विद्यार्थ्यी बनवायला शिकले व त्यांना खूप भावला.

व्हीएमएसआयआयईच्या विद्यार्थ्यांच्या या दौऱ्यात फिल्ड ट्रीप व साइट-सिईंगसारखे बाह्य सत्रदेखील होते. ‘केव्स द मुरगनहिरा’, दुरो भागातील ‘द स्पार्कलिंग वाईन सेलर’ यासारख्या ठिकाणांमुळे मुलांना आकर्षित अनुभव मिळाला. केव्स द मुरगनहिरामधील जोआओ कार्वाल्हो  यांनी विविध प्रकारच्या मद्याबद्दल, त्याना बनवण्याची प्रक्रियेबद्दल व आरोमासहीत मद्याच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सबद्दल  विद्यार्थ्यांना सत्रांत माहिती दिली.

विद्यार्थ्यांना ओलिव्ह ग्रुवला भेट देण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्यांना ओलिव्ह झाड संस्कृती, इतिहास, ओलिव्ह तेलाचे उत्पन्न व फारो येथील रोमन काळातील मोंतेरोसो ओलिव्ह फार्मदेखील पाहण्याची संधी मिळाली. ओलिव्ह तेल टेस्टिंग सत्रद्वारे विविध प्रकारच्या ओलिव्हशी परिचित करण्यात आले. याशिवाय त्यांना विविध खाद्यपदर्थांमध्ये त्याचा कसा उपयोग करायचा याची माहिती देण्यात आली.

शेवटच्या आठड्यात व्हीएमएसआयआयच्या विद्यार्थ्यांनी बालकांव, बिफ क्रोकेट्स, सार्दिन आंबट-तिखट व गोव्यातील स्थानिक गोड पदार्थ बटीक.

व्हीएमएसआयआयईचे संचालक व प्राचार्य इरफान मिर्झांनीदेखील पोर्तुगालमधील पाककृतीतील प्रगती पाहण्यासाठी गेले होते.

मायदेशी परतन्यावेळी विद्यार्थ्यांनी पोर्तुगाली डेलिकसीससह प्रमुख अतिथींसाठी, विद्यार्थ्यांसाठी व फेकल्टी मंडळीसाठी खास मेन्युचे नियोजन केले. संचालक इरफान मिर्झा बरोबर त्यांच्या टीमने याचे यजमान केले होते. फुंदासो ओरियंटच्या संचालिका मारिया इन्स फिगेरा व फर्स्ट हॉलिडेजचे संचालक आतिश फर्नांडिस यांना खास अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ठराविक पाणी ब्रेडसह, टुना पेट व मार्गिनेटीड ओलिव्ह्स आणि कॅरव अल्गार्वे पध्दतीने मेन्युची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सोपा द क्रेसाओ या फ्लेवर्ड शार्प सूप देण्यात आले. मेन कोर्समध्ये विद्यर्थ्यांनी मिन्हो पध्दतीने मिल ऑफ रोस्टीड  लॅम्ब आणि फ्रेश व  क्रन्ची बिन सालाद होतं. शेवटी मऊ व रसदार संत्र व केरब रोल ऑरेंज सेगमेंटबरोबर देण्यात आलं.