व्हिएतनाम हे आग्नेय आशियातील विकासाचे नवे केंद्र: सुरेश प्रभू 

0
1044

गोवा खबर:व्हिएतनाम ही आसियान देशसमुहातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. भारत-व्हिएतनाम आर्थिक संबंधांबाबत नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि धार्मिक साम्यस्थळे भारताच्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्याचबरोबर भारताच्या पंतप्रधानांच्या ॲक्ट इस्ट धोरणाने सामायिक विकासाची द्वारे खुली केली आहेत असे मत प्रभू यांनी व्यक्त केले.

वाणिज्य, व्यापार, राजकारण आणि संरक्षण या बाबतीत आसियान क्षेत्रात भारत आणि व्हिएतनामची भूमिका महत्वाची आहे.1975 साली भारताने व्हिएतनामला “मोस्ट फेवर्ड नेशन” चा दर्जा दिला असून त्यानंतर द्विपक्षीय व्यापारात चांगली वाढ झाल्याचेप्रभू यांनी नमूद केले. व्हिएतनामचे राजदूत तोन-सिन्ह-थान्ह या परिषदेच्या उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते.