‘व्हाय’ लघुपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात

0
1073

गोवा खबर:आरआरजी क्रिएशनस् आणि एसआरएस निर्मित ‘व्हाय’ नॉन फिचर फिल्मच्या चित्रिकरणाला आज निसर्गरम्य अशा कासावली गावातील एका पोर्तुगीज शैलीतील घरामध्ये  चित्रपट निर्माता, गीतकार आणि माजी आमदार श्री. दामू नाईक यांच्या हस्ते मुहूर्त क्लॅप देऊन शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी नॉन फिचर फिल्मचे दिग्दर्शक  टिंकि जॉर्ज आणि  प्रशांत शिरोडकर, सिनेमॅटोग्राफर  जोसफर्न डिसोझा, सहाय्यक दिग्दर्शक जॉन्सन इयापेन,  समीर अडकोणकर,  सुदेश निपाणीकर, कलाकार  दामोदर यशवंत डिचोलकर,नवदिप आगियार, अंजली आगियार, अक्षता नाईक, पूजा पालयेकर धारगळकर, मयांक नाईक, संगीता खाकम शिरोडकर, लानकास्टर परेरा आंद्रे त्याचप्रमाणे कलाकार मनाली प्रभू, कविश च्यारी, प्रज्योत शिरोडकर व इतर कलाकार उपस्थित होते.

‘व्हाय’ नॉन फिचर फिल्मचे कथानक हे मुलगा आणि वडील यांच्या नात्यावर आधारित आहे. मुलाची भूमिका नवदीप साकारतो आहे तर वडीलांची भूमिका अभिनेता  दामोदर यशवंत डिचोलकर साकारणार आहेत.

 प्रशांत शिरोडकर यांची पटकथा असून  टिंकि जॉर्ज यांनी या नॉन फिचर फिल्मचे  दिग्दर्शन केले आहे. आर. एस. गौडा हे या नॉन फिचर फिल्मचे निर्माते आहेत.