व्हायब्रंट गोवा समिटमध्ये 15 आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिनिधींसह सामंजस्य करार

0
949

 

 

गोवा खबर: व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो अँड समिट (व्हीजी-जीईएस) 2019 मधील पहिल्या दोन दिवसांतच परराष्ट्र व्यापार प्रतिनिधीमंडळ आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) आणि व्हायब्रंट गोवा फाउंडेशन यांच्यात तब्बल 15 सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी झाली. 

सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणार्‍या 15 परदेशी व्यापार प्रतिनिधीमंडळांमध्ये इंडियन अमेरिकन बिझिनेस कौन्सिल (आयएबीसी) यूएसए, इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसीसी) कॅनडा, क्वालालंपूर आणि सेलांगोर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (केएलएसआयसीसीआय) मलेशिया, मलेशियन इंडियन बिझिनेस कौन्सिल (एमआयएससी) मलेशिया, सिंगापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एससीसीआय) सिंगापूर, बाहरिन लघु व मध्यम उद्योग, बाहरीन, भूतान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (बीसीसीआय) भूतान, इंडियन बिझिनेस अँड प्रोफेशनल्स कौन्सिल (आयबीपीसी) कतार, नेपाळ चेंबर ऑफ कॉमर्स (एनसीसी) नेपाळ, ओमान बिझिनेस फोरम (ओबीएफ) ओमान, बिझिनेस क्लब फ्रान्स लेंडे (बीसीएफआय) फ्रान्स, सौदी भारतीय व्यवसाय नेटवर्क (एसआयबीएन) सौदी अरेबिया, चाइना ट्रेड फोरम (सीटीएफ) चीन, इंडो-बाल्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एस्टोनिया आणि स्पोर्ट लिस्बोआ ई बेनिफिका, पोर्तुगाल यांचा समावेश आहे.

यामधील तीन परदेशी व्यापार प्रतिनिधी अनुक्रमे सिंगापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एससीसीआय) सिंगापूर, भूतान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (बीसीसीआय) भूतान आणि स्पोर्ट लिस्बोआ ई बेनफीका, पोर्तुगाल यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. उर्वरित 12 विदेश व्यापार प्रतिनिधींनी व्हायब्रंट गोवा फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केले आहेत.

जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाला व्यापार प्रतिनिधींना दिलेली भेट पाहून आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद होत आहे. आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स या निर्णयाचे स्वागत करीत आहे, असे काकुलो म्हणाले.

व्हायब्रंट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत म्हणाले की, “ही केवळ एक सुरुवात आहे. आम्ही या प्रस्थापित झालेल्या संबंधावर कार्य करू आणि गोवा आणि उर्वरित जगाच्या दरम्यान सतत व्यापार आणि गुंतवणूकीच्या उपलब्ध असणाऱ्या संधींचा शोध घेऊ.”