व्हायब्रंट गोवाचे नेपाळ आणि भुतानमध्ये यशस्वी रोड शो

0
1535

 

गोवा खबर: व्हायब्रंट गोवा टीमने नेपाळ आणि भुतानमध्ये व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो आणि समिट (व्हिजि – जीइएस) २०१९ च्या प्रचारार्थ दोन रोड शो यशस्वीपणे पार पडले. हि समिट गोव्यामध्ये यावर्षी ऑक्टोबर १७ ते १९ या कालावधीत होणार आहे. 

नेपाळमध्ये व्हायब्रंट गोवाच्या टिमने नेपाळ टुरिझम बोर्ड, नेपाळ हॉटेल अससोसिएशन, नेपाळ चेंबर ऑफ कॉमर्स, सोसायटी ऑफ नेपाळीझ आर्किटेक्चर आणि फिल्म डेव्हलपमेंट बोर्ड यांना भेट दिली. तसेच या भेटीदरम्यान येथे असणाऱ्या फार्मासिटीकल आणि मस्तव्यवसाय क्षेत्रातील संधींची जाणीव झाली.

व्हायब्रंट गोवाच्या नेपाळ टूरवर असणारे व्हायब्रंट गोवाचे कोअर टीम मेंबर मिलिंद अन्वेकर म्हणाले, व्हायब्रंट गोवाच्या प्रतिनिधींनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्हायब्रंट गोवाची क्षमता आणि व्यावसायिक संधींबाबत माहिती दिली. ज्यामुळे पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि वास्तुशास्त्र तसेच वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान तसेच आयात निर्यात क्षेत्रातील संधींचा लाभ घेता येऊ शकतो.

अन्वेकर यांच्या मते, प्रेझेंटेशनसह टीमने नेपाळ टुरिझम बोर्ड, नेपाळ हॉटेल अससोसिएशन, नेपाळ चेंबर ऑफ कॉमर्स, सोसायटी ऑफ नेपाळीझ आर्किटेक्चर आणि फिल्म डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यासोबत बैठक केली आणि येथे असणाऱ्या फार्मासिटीकल आणि मस्तव्यवसाय क्षेत्रातील संधींची जाणीव करून देण्यात आली.

व्हायब्रंट गोवाच्या आतंरराष्ट्रीय रोड शोच्या संकल्पनेवर प्रभावित झाले आहे. तसेच यावेळी  नेपाळमध्ये ‘विझिट नेपाळ २०२०’ नावाचा उपक्रमाची तयारी सुरू असून त्यांनी व्हायब्रंट गोवाच्या टीमने या उपक्रमाच्या आंतरराष्ट्रीय प्रसिध्दीसाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अन्वेकर म्हणाले, नेपाळमध्ये त्यांची स्वतःची फिल्म सिटी उभी करण्यासाठीचे प्लॅंनिंग सुरू आहे. याकरिता शक्य त्या सामंजस्य करारासाठी गोवा मनोरंजन संस्थेसोबत संलग्निकरण करण्यासाठी आणि भारतामध्ये नेपाळ फिल्म फेस्टिव्हलच्या प्रमोशनसाठी गोवा भेट आयोजित केली जाणार आहे.

नेपाळ चेंबर ऑफ कॉमर्सनेसुद्धा गोव्यातील चेंबर ऑफ कॉमर्ससोबत सामंजस्य करार करण्यात रुची व्यक्त केली आहे. नेपाळ स्मार्ट सिटी संदर्भात नियोजन करीत असून स्मार्ट सिटीबाबत पार्टनरशिप आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण संधींबाबतसुद्धा योजना आखत आहे.

ज्येष्ठ नेपाळी सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीसोबत व्हायब्रंट गोवा टीमने नेपाळमधील भारताचे राजदूत मंजिव सिंघ पुरी आणि भारतीय दुतावासाचे कॉमर्स विभागाचे प्रमुख केपी सिंघ यांचीही भेट घेतली.

व्हायब्रंट गोवाच्या नेपाळ भेटीवर गेलेल्या टीममध्ये रिता मोदी जोशी, अरमान बंकले, गौतम खरांगटे आणि मिलिंद अन्वेकर यांचा समावेश होता.

याच रितीने व्हायब्रंट गोवा टीमचे दोन सदस्य राजकुमार कामत आणि अजय ग्रामोपाध्ये यांनी भूतानला भेट देत व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो अँड समीट (व्हिजि – जीइएस) २०१९ चा प्रचार केला.

ग्रामोपाध्ये यांच्यामते या रोड शोची बैठक भारताच्या थिम्फू येथील दूतावासात पार पडली. ४२ भुतानी व्ययसायिक, असोसिएशनचे प्रमुख आणि इतर संस्थांमधील प्रतिनिधींनी या बैठकीला हजेरी लावली. द भूतान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसुद्धा या उपक्रमासाठी सहयोग करीत होते. भूतान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष फुब झाम यांनी व्हिजि-जिईएस २०१९ साठी ट्रेड डेलिगेशन पाठविण्याची शाश्वती दिली आहे.

ग्रामोपाध्ये म्हणाले, भारताचे भुतानमधील दूत कांबोज यानी गोव्यात येणाऱ्या भूतान ट्रेड डेलिगेशनला पाठिंबा देण्याची कबुली दिली आहे. गोव्यात होणाऱ्या व्हायब्रंट गोवा समिटला भुतानमधून जास्तीत जास्त प्रतिनिधींची अपेक्षा आहे.