वॉटरबेबी खुशी उद्या गोव्यात देणार स्वच्छ भारतचा संदेश

0
1056
 गोवा: डाॅ. खुशी पोर्णिमा परमार,ही पंधरा वर्षाची युवती उद्या वास्को समुद्रात ‘लेक वाचवा लेक जगवा’ आणि ‘मुली निर्भय असतात’ ह्या उपक्रमाच्या अंतर्गत १०१ स्कुबाडाईव्ह पूर्ण करणार आहे. गोवा, मलेशिया, मिरी, बाली अशा विविध देशातील समुद्रकिनारे तिने यापूर्वी समुद्रमिठीत घेतले आहेत. तिने सात एशिया रेकाॅर्ड प्रस्थापित केले असून, ह्या लहान वयात वर्ल्ड रेकाॅर्ड युनिव्हर्सिटी कडून डाॅक्टरेट देखील मिळवली आहे. गोव्यात उद्या तिची १०१वी  डाईव्ह  असून, ‘स्वच्छ भारत अभियानाचा’ पुरस्कार करत, ती त्या ह्या डाईव्हमध्ये समुद्राच्या पोटातील कचरा बाहेर काढणार आहे.
खुशी ही सात आशिया बुक रेकाॅर्ड व इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड करणारी अाशियातली पहिली मुलगी आहे.
 लेक वाचवा, लेक शिकवा, मुली निर्भय असतात या उपक्रमाची सुरुवात १० डिसेंबर २०१४ रोजी तिने करताना तीने अखंड ६ तास ३२ मिनिटे पोहण्याचा विक्रम केला  होता.
 २७ एप्रिल २०१४ रोजी खुशीने आशियातील सर्वात लहान वयात (१२ वर्षे १ महिना) स्कुबा डायव्हिंगचे लायसन्स मिळवले
 ३० मे २०१५ रोजी खुशीने स्वतःच्या वाढदिवशी माऊंट कार्मेल शाळेच्या ग्राऊंडवरती मोटारसायकवरुन ३ सेकंदात ५७३ ट्युबलाईट छातीवर फोडण्याची कामगिरी करून दाखवली होती  २२ एप्रिल २०१६ रोजी खुशीने गोव्यातील समुद्रात २ तास १ मिनिट स्कुबा डायव्हिंगचा सराव केला आणि १८ एप्रिल ते २३ एप्रिल या दरम्यान ११ तास ३० मिनिटे स्कुबा डायव्हिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ३ जुलै २०१६ डेक्कन जिमखाना टिळक तलाव येथे २ तास १ मिनिट ४८ सेकंद अंडरवाॅटर एक्टिव्हिटीचा विक्रम खुशीने केला आहे.
 ४ जुलै २०१६ रोजी ६ शाळेना भेटी देऊन शाळांमधील १५०० मुलांबरोबर ‘व्यायाम करा’ या उपक्रमा अंतर्गत एरोबिक्स करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
खुशीने वेस्ट बंगाल भागिरथी नदीचा १९ मैलाचा पल्ला पोहून पार केला.
२० डिसेंबर २०१५ गंगा नदीचा १४ मैलाचा टप्पा, तसेच गेट वे ते एलिफंटा केव्हज हा १९ सागरी मैलाचा टप्पा २२मार्च१५ रोजी पोहून पार केला.
१५एप्रिल१५ रोजी मोरा जेट्टी ते गेट वे आॅफ इंडिया १३ सागरी मैलाचा टप्पा खुशीने पार केला आहे.
सदरच्या सर्व उपक्रमांची दखल घेत, एशियातील सर्वात लहान वयात वर्ल्ड रेकाॅर्ड युनिव्हर्सिटी कडून डाॅक्टरेटचा सन्मान बहाल करण्यात आली आहे.
खुशीने विदेशात देखील आपली झलक दाखवली आहे.
२१ ते २८ आॅक्टोबर २०१६ मालदीव येथे व २१ ते २५ मे २०१७ मलेशिया येथे डीप डायव्हिंग (३० मिटरच्या खाली) व अंडरवाॅटर फोटोग्राफीचा सराव खुशीने केला आहे.
तसेच आता दिनांक १९ ते २६ आॅगस्ट २०१७ इंडोनेशिया (बाली) येथे सरावास जाणार आहे व आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त २१ ते २८ आॅक्टोबर २०१७ या कालवधीत १०१ स्कुबाडाईव्हचा उपक्रम पूर्ण करण्याची जिद्द बाळगली आहे.