वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या नव्या रेनो क्वीड 2018ची श्रेणी बाजारात  दाखल

0
1180

 

क्वीडने 2.5 लाख विक्रींचा आकडा पार केला

 

  • वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या रेनो क्वीड 2018च्या रचनेत सुधारणा करण्यात आली असून सर्वोत्तम गुणवत्तेच्या या वैशिष्ट्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू नाही.
  • प्रथम दर्जाच्या वैशिष्ट्यांमुळे ही नवी श्रेणी जास्त आकर्षक झाली आहे-
  • एकात्मिक रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
  • रियर आर्म रेस्ट
  • प्रवाशांच्यासोयीसाठी रियर 12 वॉल्ट सॉकेट
  • रेनो क्विडच्या एएमटी व्हेरीएंट मध्ये ट्राफिक असिस्ट तसेच सगळ्या व्हेरीएंट मध्ये रियर ईएलआर (एमर्जेन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर) सोबत ही नवीन श्रेणी अधिक नाविन्यपूर्ण होत आहे.
  • 4 वर्षे किंवा 1 लाख किमीच्या वॉरंटीमुळे क्वीड ही या श्रेणीतील सर्वात जास्त भुरळ घालणारी आणि परवडणारी गाडी आहे
  • ही 8 वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असून, ही नवी श्रेणी हस्तचलित आणि एएमटी पर्यायांमध्ये 0.8 एल आणि 1.0 एल एससीई पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध

 

गोवा खबर: रेनो हा भारतातील अग्रणी युरोपियन ब्रँड असून त्यांनी आज नव्या क्वीड 2018 वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या श्रेणी बाजारात दाखल केल्याचे जाहीर केले.  या हस्तचलित आणि स्वयंचलित अशा दोन्ही प्रकारच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.  या आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि परवडणाऱ्या कार्सची 2,50,000 पेक्षा जास्त विक्री  करून रेनो इंडियाचा चेहरा-मोहराच बदलला आहे. श्रेणीतील गुणवत्तापूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ही कार 8 वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असून वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारी नवी रेनो क्वीड 2018 ही कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय बाजारात दाखल करण्यात आली असल्याने ती जास्त मौल्यवान ठरत आहे.

 

या कार्यक्रमाच्या वेळी रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमित साहनी म्हणाले की, “2.5 लाखांपेक्षा जास्त ग्राहक मिळवून, छोट्या कार्सच्या श्रेणीत रेनो क्वीडने यशस्वीरीत्या स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.  ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या आवडी-निवडी लक्षात घेऊन नियमित उत्पादनांमध्ये सुधारणा करून आम्ही आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन क्वीडची निर्मिती केली आहे.  वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारी नवी रेनो क्वीड 2018मध्ये डिझाईन्स आणि तांत्रिक नाविन्याचा समावेश असून आम्ही ती परवडणाऱ्या किंमतीत ग्राहकांना देत असल्याने ही कार जास्त आकर्षक ठरली आहे.  क्वीडची लोकप्रियता आणखी वाढावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  आम्ही आमचे भारतातील स्थान आणखी बळकट करण्याच्या प्रयत्नांत असल्याने रेनो परिवारात आणखी ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या नव्या रेनो क्वीड श्रेणीत जास्त लांबी, पॉवर आणि वजन यांचे गुणोत्तर, बूट स्पेस, ग्राउंड क्लीअरन्स आणि कटिंग एज तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.  यामध्ये प्रथमच काही वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला आहे.  एसयुव्हीपासून प्रेरणा घेऊन याची रचना करण्यात आली असून यामध्ये 7 इंची टचस्क्रीन मिडिया एनएव्ही सिस्टम, मागील कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट क्लस्टर, वन टच चेंज लेन इंडिकेट, रेडीओ स्पीडवर अवलंबून असणारे आवाज नियंत्रण आणि भार नियंत्रणासह प्रो-सेन्स सीटबेल्ट प्रीटेन्शनर्स या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्तम वैशिष्ट्यांमध्ये 300 लिटर्सची बूट क्षमता, 180 मिमीचा ग्राउंड क्लीअरन्स, अर्गो-स्मार्ट केबिन, समानासाठी मोठी जागा, अप्पर सेग्मेंट बॉडी डायमेन्शन्स, अंतर्गत जागा, सर्विस पार्ट्सच्या देखभालीचे मूल्य, प्रवास, हाताळणी आणि अन्य वैयक्तिक पर्यय यांचा समावेश आहे.  कारची लांब आणि रुंदीदेखील अत्युत्तम असल्याने रस्त्यावरील तिचे अस्तित्व हे नजरा आकर्षित करणारे आणि शक्तीशाली आहे.  या श्रेणीत पॉवर स्टेअरिंग, 3 आणि 4 स्पीड मॅन्युअल एसी, ओआरव्हीएम पॅसेंजर साईड, इंजिन इमोबीलायझर, ब्ल्यूटूथ आणि टेलिफोनीसह सिंगल डीन ऑडीओ, पुढील स्पीकर्स आणि 12 वॉल्ट पॉवरचे सॉकेट इत्यादी बाबींचा समावेश आहे.

 

रेनो क्वीड 2018 श्रेणीवर कोणतेही अतिरिक्त मूल्य न लावता 4 वर्षे/1 लाख किमी (जे आधी पूर्ण होईल ते) ची वॉरंटी आणि रस्त्यावरील मदत देऊ करण्यात आली आहे.  यामध्ये नियमित 2 वर्षे/ 50,000 किमीच्या व्यापक वॉरंटीचा समावेश तर आहेच, त्याचसोबत अतिरिक्त 2 वर्षे/ 50,000 किमीसाठी वाढीव वॉरंटी देण्यात आल्याने ग्राहकांना अजोड अशा मालकीचा अनुभव मिळू शकेल.

 

सहा आकर्षक रंगांमधून ग्राहकांना निवड करता येणार आहे – क्वीड क्लायंबरसाठी फेअरी रेड, प्लॅनेट ग्रे, मूनलाईट सिल्व्हर, आईस कुल व्हाईट, आउटबॅक ब्राँझ आणि इलेक्ट्रिक ब्ल्यू.  वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणाऱ्या नव्या रेनो क्वीड 2018 श्रेणीसाठीची नाव नोंदणी ही भारतातील सर्व रेनो वितरकांकडे सुरू झाली आहे.

रेनो क्वीड 2018 श्रेणी: किंमत

 

वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेनो क्वीड 2018 श्रेणी        किंमत

(एक्स शोरूम, नवी दिल्ली)

 

Standard – 0.8L SCe INR 266,700
RXE – 0.8L SCe INR 309,800
RXL – 0.8L SCe INR 335,900
RXT-O (MT) – 0.8L SCe INR 382,500
RXT-O (MT) – 1.0 L SCe INR 404,500
RXT-O- (AMT) – 1.0 L SCe INR 434, 500
KWID Climber MT- 1.0 L SCe INR 429,500
KWID Climber AMT- 1.0 L SCe INR 459,500

 

 

रेनो संबंधी

 

रेनो इंडिया प्रा. लि. ही रेनो एस. ए. एस. फ्रान्स कंपनीची संपूर्ण मालकी असणारी उपकंपनी आहे.  रेनो इंडिया कार्सचे उत्पादन हे ऑरगडम, चेन्नई येथील कारखान्यात केले जाते.  याची वार्षिक उत्पादन क्षमता ही 480,000 कार्स इतकी आहे.  सद्य परिस्थितीमध्ये रेनो इंडियाचे अस्तित्व हे 320 विक्री केंद्रे आणि 269 सेवा केंद्राच्या मार्फत देशभरात पसरले असून त्यांनी आपल्या विक्रीने आणि सेवा गुणवत्तेने स्वतःला सिद्ध केले आहे.

रेनो इंडियाने त्याचंही उत्पादने आणि सेवा या जोरावर ग्राहकांमध्ये आणि उद्योगातील इतर मान्यवरांमध्ये स्वतःची मोठी ओळख निर्माण केली आहे.  60हून अधिक पुरस्कार मिळवून रेनो इंडिया हा एका वर्षात सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त करणारा भारतातील एक ऑटोमोटिव्ह ब्रँड ठरला आहे.  रेनो क्वीडने आत्तापर्यंत 32 पुरस्कार मिळविले आहेत आणि त्यामध्ये ‘कार ऑफ द इअर’च्या 10 पुरस्कारांचा  समावेश आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा-

जतीन अगरवाल

हेड-पब्लिक अफेअर्स अँड कम्युनिकेशन

रेनो इंडिया प्रा. लि.

ई-मेल-  jatin.aggarwal@renault.com

@RenaultIndiaPR @RenaultIndia