वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रशियन शासकीय विद्यापीठांनी जाहीर केल्या शिष्यवृत्ती

0
1249

 

 

 गोवा खबर:रशियन संघराज्याच्या राष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून रशियातील शासकीय विद्यापीठांनी एमबीबीएस आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केल्या आहेत. भारतात गुणवत्ता असूनही कित्येक विद्यार्थ्यांना एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही कारण विद्यापीठांमधील उपलब्ध प्रवेश मर्यादित असतात. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनाही थोड्या जागांसाठी फार मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागते.

 

रशियन सरकारची विद्यापीठे ही जागतिक स्तरावर मान्यता पावली असून त्यांतील जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधासंशोधन सुविधा आणि उच्च शिक्षित प्राध्यापक यांची नेहमीच वाहवा झाली आहे. या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना येथे अतुलनीय अभ्यासाची संधी मिळते. आय एम सेचेनोव्ह मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटीटेमबॉव्ह स्टेट युनीव्हर्सिटीपायटीगोर्स्क वोल्गोग्रड स्टेट मेडीकल युनिव्हर्सिटी,अस्त्राखान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीसाराटोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि रशियातील युरोपचा भाग असलेल्या क्षेत्रातील विद्यापीठांचा या विद्यापीठांमध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी त्यांचे प्रश्न आणि शंका www.edurussia.in वर लॉग-इन करून किंवा +९१.२२.६१०५४५४८ या क्रमांकावर दूरध्वनीद्वारे विचारू शकतात.

 

सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी भारतातील रशियन संघराज्याच्या वाणिज्य दुतावासाने एडयुरशियाला या कामासाठी प्रमाणित केले आहे. एडयुरशिया’ ही संस्था रशियन राज्य आणि शासकीय विद्यापीठांमधील प्रवेशासाठीचा भारतातील अधिकृत प्रवेश विभाग आहे. माहिती आणि प्रवेश यांसाठी एक अधिकृत विभाग याशिवाय एडयुरशिया’ ही संस्था रशियन सरकारच्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विभाग म्हणूनही काम पाहते.

 

कित्येक रशियन विद्यापीठे ही शंभरहूनही अधिक वर्षे जुनी आहेत. वैद्यकीयविज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील संशोधनामध्ये यातील कित्येक विद्यापीठे अग्रणी आहेत. इलीझारोव्ह सर्जिकल प्रिन्सिपल्स सारखी कित्येक आंतरराष्ट्रीय तंत्रे ही रशियामध्ये विकसित झालेली आहेत. रशियन विद्यापीठातील कित्येक नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी वैद्यकीय आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे शोध लावले आहेत, त्यावरूनरशियाचा हा अतुलनीय असा वारसा अधोरेखित झाला आहे. कित्येक भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना ज्ञात नाही की जागतिक स्तरावर मान्यता पावलेली अभियांत्रिकी संस्था आयआयटी मुंबई’ या संस्थेची स्थापना ही रशियन सरकारच्या सहकार्यातून झालेली आहे. आर्थिकतंत्रज्ञानात्मक आणि साहित्य सामुग्रीच्या क्षेत्रातील हे सहाय्य होते.

 

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यामधील अत्यंत महत्वाचा फरक असाही आहे कीआज हजारो यशस्वी पदवीधर हे डॉक्टर म्हणून कित्येक आघाडीच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये भारतात काम करत आहेत. या रुग्णालयांमध्ये नवी दिल्ली येथील एआयआयएमएससारख्या रुग्णालयांचा समावेश आहे. त्यातील एक असलेल्या डॉ समृद्धी भानुशाली यांनी रशियातून आपली पदवी प्राप्त केली आहे.

 

त्या म्हणतात, “रशियातील विद्यापीठांमधील हे अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये घेतले जातात आणि उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय प्रात्यक्षिकांची संधीही दिली जाते. भारतीय विद्यार्थ्यांसाठी येथे सुरक्षित आणि आरामदायी असे वातावरण उपलब्ध आहे. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीयर्सकडून प्रेरणा मिळते. अनेक भारतीय विद्यार्थी अगदी १९९०च्या दशकापासून रशियातील विद्यापीठांमध्ये शिकले आहेत. त्यामुळे रशियन संघराज्यातील ही विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शाबित झालेल्या शिक्षणसंस्था आहेत. आज येथील अनेक विद्यार्थी हे भारतातील अनेक आघाडीच्या रुग्णालयांमध्ये प्रॅक्टीस करत आहेत तर त्यातील काही हे परदेशांमध्ये कार्यरत आहेत. मी या विद्यार्थ्यांना फक्त एकाच गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला देईनआणि तो म्हणजे त्यांनी येथील प्रमाणीत विद्यापिठांमध्येच प्रवेश घेतला पाहिजे. एडयुरशिया’ या अधिकृत विभागाच्या माध्यमातून प्रवेश घेतल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

 

अधिक माहितीसाठी विद्यार्थी त्यांचे प्रश्न आणि शंका www.edurussia.in वर लॉग-इन करून किंवा +९१.२२.६१०५४५४८ या क्रमांकावर दूरध्वनीद्वारे विचारू शकतात.