वेदान्ता समूहाने नावेली व आमोणा येथे केले निर्जंतुकीकरण

0
725

गोवा खबर : वेदान्ता – सेसा आयर्न ओर, गोवा यांनी हंस पेस्ट कंट्रोल
सर्व्हिसेसच्या सहकार्याने कोविड १९ ला मात देण्यासाठी आमोणा व नावेली
गावात बसस्थानके, मंदिरे, मंडप आणि दुकाने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी
निर्जंतुकीकरण केले. याव्यतिरिक्त, दोडामार्ग भागातील बाजारपेठच्या ठिकाणी
देखील कंपनीने निर्जंतुकीकरण केले.

यामुळे कीड, वाळवी किंवा इतर कोणत्याही
हानिकारक कीटकांचा नाश होतो आणि त्या भागात काम करणाऱ्या लोकांना कोणताही
संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.