वेदांता समूहाचे ‘ बाल्को मेडिकल सेंटर ‘ कर्करोगमुक्त भारताच्या दृष्टीने कार्यरत

0
974

गोवा खबर: ४ फेब्रुवारी, २०२० (जागतिक कर्करोग दिन) पर्यंत
बाल्को मेडिकल सेंटर,  वेदांत वैद्यकीय रिसर्च फाऊंडेशन
(व्हीएमआरएफ) च्या वतीने १७० खाटांचे अत्याधुनिक मल्टी – मोडिलिटी
डायग्नोस्टिक आणि उपचारात्मक सुविधा रुग्णालय रायपूर छत्तीसगड येथे
बांधण्यात आलेले आहे. ६५०० पेक्षा अधिक रुग्णांचे येथे उपचार करण्यात आलेले
आहे. स्थापनेनंतर अल्पावधीतच  बीएमसीने हजारो अधिक लोकांच्या जीवनात
जागरूकता निर्माण करून, सल्लामसलत, तपासणी करून सुरुवातीला छत्तीसगड आणि
आसपासच्या राज्यांत सेवा करण्याचे योजिले आहे.

बाल्को मेडिकल सेंटर पूर्व भारतातील सर्वात मोठे कर्करोग रुग्णालय म्हणून
उदयास आले आणि प्रचंड लोकप्रियता त्यांना मिळाली. 45 विशेषज्ञ डॉक्टरांनी
सर्वसोयिस्कर व परवडणाऱ्या सुविधांनी रुग्णांना दिलासा दिला.

वेदांता समूहाचे अध्यक्ष श्री. अनिल अग्रवाल यांचे भगिधरकांचे मूल्य आणि
स्थानिक समुदायाच्या वाढ या तत्वज्ञानावर , बाल्को मेडिकल सेंटरने समाज
कर्करोगमुक्त  करणारे प्रतिबंध, स्क्रीनिंग आणि उपचार हे तीन महत्त्वाचे
खांब सांगितले आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते
कर्करोगाच्या प्रतिबंधाबद्दल जागरूकता पसरविण्यास सर्वत्र अग्रेसर आहे.
मीडिया आणि इतर तज्ञांसह भागीदारी करून त्यांनी जागरूकता पसरवली
आहे. एक महत्त्वाचे दुसरे पाऊल म्हणून रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य
अभियान,  छत्तीसगड सरकार यांच्या सहयोगाने छत्तीसगडमधील 27
जिल्ह्यांमध्ये प्रदर्शन शिबिरे घेण्यात आली जेणेकरून स्तन, गर्भाशय व ओरल
या तिन्ही कर्करोगासाठी विनामूल्य स्क्रिनिंग करण्यात आली. हे शिबिर
नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू झाल्यापासून हजारोहून अधिक रुग्णांना त्याचा
फायदा झाला आहे .

बाल्को मेडिकल सेंटरच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती अग्रवाल म्हणाल्या,
“वेदांत ग्रुप सोबत त्याच्या सीएसआर च्या पावलांनी राष्ट्रीय प्राधान्य
असलेले उपक्रम आयोजित केलेले आहेत. वेदांतचा बाल्को मेडिकल सेंटर (बीएमसी)
छत्तीसगडमधील नया रायपूर येथे उभारल्या गेलेल्या
कर्करोग प्रतिबंध केंद्राने कर्करोगाचे नियंत्रण आणि निर्मूलन करण्यास
हातभार लावला. बीएमसी कडून वेगवेगळ्या ठिकाणी, समाजातील प्रत्येक वर्गातील
लोकांसाठी स्क्रीनिंग मोहीम राबवत आहे.

बाल्को मेडिकल सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. वेंकट कुमार यांनी
पुन्हा सांगितले की, “आम्ही अशा समाजाची कल्पना करतो
जिथे प्रत्येकजण कर्करोगापासून मुक्त आहे. आम्ही जागतिक स्तरावरील
कर्करोगाचे निर्मूलन  करण्याव्यतिरिक्त स्क्रीनिंग आणि
प्रतिबंधाचा मार्ग धरला तरच खर्‍या अर्थाने कर्करोग निर्मूलनाचे स्वप्न
साकार होईल आणि हीच आमची ओळख आहे. ”

आज, बाल्को मेडिकल सेंटर कर्करोगाच्या उपचारासाठी म्हणून सर्वत्र उदयास आले
आहे. रेडिएशन थेरपी, न्यूक्लियर मेडिसिन, शस्त्रक्रिया, केमोथेरपी,
इम्यूनोथेरपी, लक्ष्यित थेरपी, रक्ताशी संबंधित विकार, इत्यादींचे
प्रभावीपणे निदान बाल्को मेडिकल सेंटर येथे करण्यात येते.  प्रभावी
उपचारामुळे रुग्णालय, कर्करोगमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने
कार्यरत आहे. शैक्षणिक आणि संशोधनाच्या दृष्टीने भविष्यकाळात
बाल्को मेडिकल सेंटर ही जगातील नामांकित उत्कृष्ट केंद्र बनणार आहे. जागतिक
कर्करोग दिनानिमित्त, रुग्णालय कर्करोगाविरूद्धच्या लढाई
अग्रभागी मानते. मानवजातीच्या सर्वात धोकादायक रोगाला अत्यंत काळजीपूर्वक
आणि करुणेने निर्मूलन करणे काळाची गरज आहे.

वेदांत मेडिकल रिसर्च फाऊंडेशन (व्हीएमआरएफ) आणि बाल्को मेडिकल सेंटर बद्दल
(बीएमसी) बद्दल: वेदांत मेडिकल रिसर्च फाऊंडेशन (व्हीएमआरएफ) ही एक ना-नफा
संस्था  वेदांत रिसोर्सेस लि. आणि भारत अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड
(बाल्को) यांच्या सहयोगाने चालते.  वैद्यकीय क्षेत्रातील केंद्राद्वारे
कर्करोग आणि त्याच्याशी संबंधित आजार सर्जिकल, रेडिएशन आणि ऑन्कोलॉजी चा
माध्यमाने
रोखणे. व्हीएमआरएफचे लक्ष्य अल्ट्रा-मॉडेम, मल्टी-मोडॅलिटी रोगनिवारण
सुविधा आणणे आहे. भारताच्या लोकसंख्येच्या सहज
पोहोचताना उपचारात्मक सुविधा परवडणारी किंमत देणे बाल्को मेडिकल सेंटर,
व्हीएमआरएफचे लक्ष असेल.

त्यांचा पहिला प्रमुख उपक्रम सेट छत्तीसगडमधील नया रायपूरमध्ये १७० खाटांचे
अत्याधुनिक  45 विशेषज्ञ डॉक्टरांची सुविधा असलेले ऑन्कोलॉजी आहे. ही
संपूर्ण भारतात सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत ऑन्कोलॉजी सुविधा आहे. हे
जागतिक दर्जाचे पण परवडणारे उपचार  मानवजातीला प्रदान करते. ज्ञात रोग
सध्या भारतातील राष्ट्रीय नेते म्हणून वेगाने उदयास येत आहे. देशात
ऑन्कोलॉजी क्षेत्रात एक पुढारी म्हणून हे समूह उभारत आहेत.