वेग तपासणी यंत्राची नजर वाहन चालकांवर

0
1042

राज्यात वाहन अपघात वाढत असल्याने त्यांच्यावर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस विभाग विविध योजना अमलात आणित आहेत. वेगाने वाहने चालविणे हे एक अपघाताचे प्रमुख कारण असल्याने वेगाने वाहने चालविणाऱयावर कारवाई होणे आवश्यक आहे. म्हणूनच आता वेग तपासणी यंत्राचा वापर केला जाणार असून अतीवेगाने वाहने चालविणाऱयावर कारवाई करण्यात येणार आहे. अती वेगाने वाहन चालविणाऱया चालकाला 400 रुपये दंड दिला जाणार असून चालकाचा परवाना निलंबीत करण्यासाठी वाहतून खात्याकडे माहिती पाठविली जाणार आहे अशी माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिली आहे. सुमारे 30 लाख रुपये खर्चून चार वेग तपासणी यंत्रे तर 29.7 लाख रुपये खर्च करून अल्कोमिटर घेतले आहेत. सुमारे 300 मिटर अंतरावरूनही एखाद्या वाहनाचा वेग या यंत्रा द्वारे तपासता येतो.