वेंदांताच्या सेसा फूटबॉल अकादमी ने गोव्यातील तरूणाईला  फूटबॉल प्रशिक्षण देण्याच्या आपल्या लक्ष्यामध्ये मिळवली आघाडी 

0
3759

 

  • एसएफए च्या२०१४-२०१८ च्या बॅच च्या पदवीदान समारंभात पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
  • वेदांता कडून त्याच्या योजनाबद्ध कार्यक्रमानुसार सेसा फूटबॉल अकादमी च्या माध्यमातून देशभरांतील फूटबॉल कौशल्यांचा विकास

गोवा खबर: तरूणाईला योग्य मार्गदर्शन करून त्यांची वाढ होतांना पाहतांनाच वेदांताच्या सेसा फूटबॉल अकादमी तर्फे (एसएफए) ने आज अतिशय उत्साहाने भरलेल्या वातावरणात त्यांच्या इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात तरूण पदवीधर मुलांचा गौरव केला.

सेसा फुटबॉल अकादमी ने नेहमीच भारतातील फूटबॉल मधील कौशल्ये शोधणे, त्यांचा प्रसार करणे व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे.  ही संस्था बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या वेदांता च्या सीएसआर उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण ब्रॅन्ड आहे. त्यांच्या सेसा फूटबॉल अकादमी (एसएफए) या संस्थेच्या माध्यमातून १९९९ मध्ये गोव्यात स्थापना झाल्यापासून फूटबॉलच्या विकासात योगदान दिले आहे. निवासी पध्दतीने काम करणारी ही संस्था असल्याने या संस्थेमध्ये मुलांना पध्दतशीर पणे आणि वैज्ञानिक पध्दतीने फूटबॉलचे प्रशिक्षण दिले हाते.  हे प्रशिक्षण मुलांना फूटबॉल तज्ञांकडून मिळत असल्याने नवोदित तरूणांना पूर्णतः व्यावसायिक खेळाडू म्हणून प्रशिक्षित केले जाते.  अकादमी मध्ये औपचारिक असे शिक्षण चार वर्षांकरता त्यांच्या सांखली कॅम्पस मध्ये देण्यात येते.

अयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभाला सेसा फूटबॉल अकादमीच्या प्रमुख चमूचे सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर गोव्यातील स्टार फूटबॉलपटू तसेच खेळाचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते,  यावेळी २०१४-१८ च्या बॅचच्या १५ खेळाडूंचा गौरवही करण्यात आला. यामध्ये अॅश्ले कॉर्डोझो, कांता उर्फ डार्विन सुनिल मांडेकर, सायरस कॅन्वी नरोन्हा, डल्यान फर्नांडिस, माल्कम मार्विन गोन्साल्विस, कॅव्हिन सोअर्स, लिनोनेल डिसुझा, मार्क अॅन्जेलो बेरेटो, अनिल सुभाष चव्हाण, गोंवकर रोनालल कॅमिलो आणि रॉकी जोव्हन फर्नांडिस यांचा समावेश आहे.

सहभागी लोकांना खेळांतील तांत्रिक तसेच अन्य क्षेत्रातील कौशल्यांचा विकास करण्यासाठी वेदांत ग्रप ने आपले सहकार्य देऊ केले आहे, ही अकादमी २०१९ पर्यंत भारतातील सर्वोत्कृष्ट फूटबॉल अकादमी बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.  या विषयी माहिती देतांना सेसा फूटबॉल अकादमी चे अध्यक्ष श्री अनन्यअगरवाल यांनी सांगितले ” खेळांतून तरूणाईला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळते आणि खेळांतील वाढता उत्साह पाहता एसएफए ने नेहमीच नवोदित फूटबॉलपटूंना त्यांना फूटबॉल मधील व्यावसायिक प्रशिक्षण देऊ केले आहे, जेणेकरून देशातील पुढील पिढीतील फूटबॉलपटू निर्माण होऊ शकतील. सेसा कम्युनिटी डेव्हलमेंट फाऊंडेशन (एससीडीएफ) ने नेहमीच आपल्या सीएसआर उपक्रमांच्या अंतर्गत स्थानीय लोकांना सहकार्य केले आहे आणि आम्ही भविष्यातही हे कार्य असेच सुरू ठेऊ.”

स्थापनेपासून एसएफए ने १५० हून अधिक फूटबॉलपटूंना त्यांच्य निवासी अकादमी तून प्रशिक्षण दिले असून याचा सकारात्मक परिणाम गोवा आणि संपूर्ण देशातील फूटबॉल पटूंच्या जीवनावर झालेला दिसून येतो.  अकादमीतून प्रशिक्षण घेतेलेले काही विद्यार्थी आता भारतीय फूटबॉल टिम बरोबरच इंडियन सुपर लीग (आयएसएल) क्लब्ज कडून तसेच गोव्यातील आयलीगच्या टिम्स बरोबर खेळत आहेत.  यांत सात खेळाडूंना भारतीय फूटबॉल टिमची कॅप मिळाली आहे तर सहा खेळाडूंनी गेल्या मोसमातील एलिट आयएसएल खेळण्याची संधी मिळवली आहे.  सध्या गोव्यातील ३८ व संपूर्ण देशांतील २८ तरूण तसेच झांबिया चे खेळाडू  २०१७ च्या बॅच मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

माजी भारतीय कप्तान तसेच सेसा फूटबॉल अकादमीचे सल्लागार श्री बायचुंग भुतिया हे ही या पदवीदान समारंभाला उपस्थित होते ते म्हणाले ” गोव्याशी माझ्या अनेक बालपणीच्या आठवणी निगडीत आहेत.  खेळाडूंना आणि चांगल्या फूटबॉल पटूंना प्रोत्साहन देऊन एसएफए अतिशय चांगले काम करत आहे.  खेळाडूंना अशा चांगल्या सुविधा आणि मार्गदर्शन लाभलेले पाहतांना मला आनंद होत आहे.”

त्यांच्या सोबत कॅटोलनिया चे युएफा प्रो लायसेन्स कोच तसेच एसएफए चे टेक्निकल डायरेक्टर श्री एडवर्ड बॅटेल बसार्ट हे सेसा गोवा वेदांता फूटबॉल प्रोजेक्ट चे सीईओ आहेत.   श्री सुखविंदर सिंग यांनी समाजाच्या विकासासाठी तसेच खेळातील तरूणाईच्या कौशल्य विकासावर विशेषकरून फूटबॉल च्या विकासावर वेदांता ने कशा प्रकारे सहकार्य केले आहे यावर जोर दिला. अकादमी ने महिला आणि मुलींच्या फूटबॉलच्या प्रशिक्षणावरही जोर दिला असून त्यांनी जुलै मध्ये होणाऱ्या विमेन्स फूटबॉल लीग च्या दुसऱ्या पर्वाचे प्रायोजकत्वही स्विकारले आहे.

ही महत्त्वपूर्ण घटना पूर्ण केल्याची घोषणा करतांना श्री सिंग यांनी पुढे सांगितले ” आताच्या काळात देशांत फूटबॉल मध्ये लोकांचा उत्साह वाढतांना दिसतो.  एसएफए मध्ये आम्ही फूटबॉलचा स्तर वाढवण्यासाठी मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबरोबरच  भारतात खेळासाठी प्रोत्साहनपर वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”

 

About SESA Football Academy:

An initiative of SESA Community Development Foundation (SCDF), SESA Football Academy (SFA) was founded in 1999 for the holistic development of the local youths through football. The academy has created the conditions for discovering, creating and building talent for football. SFA does not restrict itself to football trainings but involves in a long term residential program which takes care of the formal education, skill development of the trainees during the four-year training period.

The academy has a strong focus on women empowerment through football. Since inception, SFA has trained more than 123 footballers and has made tremendous impact on the football fraternity in Goa as well as across India. The graduates from SFA are serving in the national teams, Indian Super League (ISL), I-League clubs of India and local clubs in Goa. 7 players have earned the national team cap and 6 players played the elite ISL last season. Presently 36 boys from Goa and 22 youngsters from across the country and Zambia are a part of the 2017 batch.

For updates, log in

Facebook: https://bit.ly/2KaRBZN

Instagram: https://bit.ly/2JVdBZr