वृक्षारोपण करून शिवसैनिकांनी साजरा केला शिवसेनेचा वर्धापन दिन

0
1758
वृक्षारोपण करताना शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत. सोबत मंदार पार्सेकर, श्रीधर सिमेपुरूषकर, सुरज वेर्णेकर, सुशांत पावसकर, झायगल लोबो, वंदना चव्हाण, सुरज नाईक आणि शिवसैनिक.
गोवा खबर: शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांनी बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथे महामार्गा लगत वृक्षारोपण केले. गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. सुमारे १० ‘रेन ट्रीची’ लागवड करण्यात आली.
 मुंबई गोवा महामार्ग क्रमांक  ६६ चौपदरी महामार्गाच्या विकासकामांसाठी गोव्यात ३५०० पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात येत आहे.त्यामुळे गोव्याची नैसर्गिक संपदा अबाधित ठेवण्याच्या संकल्पनेतून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न शिवसैनिकांतर्फे करण्यात येत असल्याचे जितेश कामत यांनी उपस्थितांना सांगितले.
 कामत म्हणाले, प्रत्येक गोंयकाराने यंदा पावसाळ्यात किमान एक झाड लावण्याचा संकल्प सोडल्यास केवळ २०२० आधी राज्यात कमीत कमी आठ लाख झाडे उभी होऊन हरीत क्रांती घडू शकते. गिरी येथील महामार्गावरील जी कल्पवृक्षांची हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी देखील शिवसेनेतर्फे पावसाळ्यात गिरी येथे कवाथे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले.
 राज्य सचिव मंदार पार्सेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. कोषप्रमुख सुरज वेर्णेकर, मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो, म्हापसा मतदारसंघ प्रमुख सुरज नाईक, उत्तर जिल्हा सरचिटणीस सुशांत पावसकर, सचिव इरफान खान, जिल्हा जनसंपर्क प्रमुख श्रीकांत सिमेपुरुषकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सचिव वंदना चव्हाण यांनी आभार मानले.