वीज ग्राहकांना चालू त्रैमासिक एफपीपीसीए लागू ; लागणार शॉक

0
902

गोवा खबर:राज्यातील वीज ग्राहकांना विजेच्या वापरासाठी चालू त्रैमासिक म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यासाठी इंधन आणि वीज खरेदी खर्च समायोजन शुल्क भरावे लागेल. हे शुल्क वीज ग्राहकांच्या प्रवर्गनिहाय याप्रमाणे असेल.

      एप्रिल ते जून २०१९ या तीन महिन्यांसाठी हे शुल्क सरासरी प्रति युनिट १९.८१ पैसे होते, जे एका युनिटसाठी ९.३४ ते ४७.३० पैसे या मर्यादेत आहे. हेच शुल्क चालू त्रैमासिकसाठी लागू राहील.

      वीज ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी वीज खात्याला अधिक खर्च करून अतिरिक्त वीज खरेदी करावी लागते आणि त्यासाठी इंधन आणि वीज खरेदीचे खर्च समायोजन शुल्क लागू करावे लागते.