विना मास्क फिरणाऱ्यांना दंड होणार आणि मास्कही मिळणार

0
115
गोवा खबर : पणजी शहरात कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पणजी पोलिसांना उप महापौर वसंत आगशीकर यांनी 500 मास्क उपलब्ध करून दिल्यामुळे उद्यापासून वीना मास्क फिरणाऱ्यांना दंड आणि मास्कही मिळणार आहे. उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पणजी पोलिस शहरात वीना मास्क फिरणाऱ्या लोकांमध्ये जन जागृती करण्या बरोबर दंडात्मक कारवाई देखील करत आहेत.
उप महापौर वसंत आगशीकर यांनी पणजी पोलिसांना 500 मास्क उपलब्ध करून दिल्यामुळे उद्या पासून वीना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई बरोबर त्यांना मोफत मास्क देखील पुरवला जाणार आहे. आतापर्यंत फक्त पणजी पोलिस वीना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. समोवारपासून पणजी मनपा कर्मचारी देखील कारवाईत सहभागी होणार आहेत. सोमवारपासून संयुक्त कारवाई केली जाणार आहे.
उपमहापौर वसंत आगशीकर म्हणाले, कोविडचे रुग्ण वाढत असल्याने आताच खबरदारी घेण्याची गरज आहे. पणजीवासीयां बरोबर पणजीत येणाऱ्या पर्यटकांनीदेखील मास्क घालण्या बरोबर शारीरिक दूरी राखून वेळोवेळी हात सॅनिटायझरने साफ करणे आवश्यक आहे.
आम्हाला कोणावरही दंदात्मक कारवाई करण्यात आनंद मिळत नाही. कोविड संकट पुन्हा गंभीर होत आहे. प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने मास्क घालण्याबरोबर शारीरिक दूरी राखून वेळोवेळी हात सॅनिटायझरने साफ करणे आवश्यक आहे. तरच आपण, आपले कुटुंब आणि आपले राज्य आणि देश या संकटा पासून वाचू शकणार आहे, असे पोलिस निरीक्षक सुदेश नाईक म्हणाले.