विधिकार दिवस साजरा

0
1558
Chief Minister, Dr. Pramod Sawant felicitates the Ex-MLA, Shri Gajanand Raikar on the occasion of “Goa Legislators’ Day” celebration at Assembly Complex, Porvorim on January 9, 2020.

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती श्री राजेश पाटणेकर, उपसभापती श्री ईजिदोर फर्नांडिस, विधी मंत्री श्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते श्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत विधानसभा प्रकल्पात विधिकार दिवस साजरा करण्यात आला. मंचाचे उपाध्यक्ष श्री व्हिक्टर फर्नांडिस, सचिव श्री मोहन आमशेकर, खजिनदार श्री सदानंद मळिक, मंचाचे सदस्य आणि माजी व विध्यमान आमदार यावेळी उपस्थित होते.

विधिकार मंच आणि माजी आमदार हे सरकारला प्रेरणा देतात असे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारला चालू योगदान देत असल्याबद्दल सदस्यांचे अभिनंदन केले. विधिमंडळ किंवा कॅबिनेट ही एक समाजासाठी निर्णय घेणारी आणि जबाबदार अशी संस्था असल्याचे सांगितले. कांही माजी आमदार माध्यमाव्दारे अजुनही सक्रीय असल्याचे ते म्हणाले. राज्यासंबंधित विविध विषयांवर ते वृत्तपत्रात लिखाण करतात आणि सरकार त्यांच्या सूचनांचा सतत आदर करतील असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विधिकार मंचाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. डॉ. सावंत यांनी देशाच्या सर्व विधिकारांना निमंत्रित करून राष्ट्रीय पातळीवर विधिकार मंचाची परिषद आयोजित करण्याची सूचना मंच सदस्यांना केली.

यावेळी म्हादई विषयांवरील ठराव एकमताने संमत झाला. श्री पाटणेकर, श्री फर्नांडिस, श्री माविन गुदिन्हो आणि श्री कामत यांची यावेळी भाषणे झाली.

माजी आमदार श्री गोपाळराव मयेकर आणि श्री गजानन रायकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री रतन शारदा यांचे बिज भाषण झाले.

श्री मोहन आमशेकर यांनी सूत्रसंचालन केले तर श्री फर्नांडिस यांनी आभार मानले.