विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका थेट घ्या:शिवसेना विद्यार्थी विभागाची राज्यपालांकडे मागणी

0
1626
गोवाखबर:गोवा राज्य शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाने शनिवारी राज्यपालांची भेट घेऊन विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका थेट पध्दतीने घेतल्या जाव्यात अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
 निवडणुका शैक्षणीक वर्षाच्या सुरुवातीला जुलै – ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातात. गेल्या वर्षी झालेल्या विद्यापीठ निवडणुकीत शिवसेना विद्यार्थी विभागाने भाग घेतला होता. पण निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करत मुख्यमंत्र्यांनी सर्व विद्यापीठ प्रतिनिधिंची विधानसभा संकुलात बैठक घेऊन त्यांच्यावर दबाव आणला होता असा आरोप शिवसेना युवा विभागाने केला होता. ह्या पार्श्वभूमीवर शिवसेना विद्यार्थी विभागाने राज्य प्रमुख जितेश कामत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांच्या विद्यार्थी विभागांची बैठक आयोजित करून निवडणूकीवर बहिष्कार घालून निवडणूक रद्द करण्याची मागणी करत विद्यापीठावर मोर्चा काढला होता.
विद्यापीठ निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी सध्याची निवडणूक पध्दत बदलून दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या धर्तीवर ती घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना युवा विभाग संघटक आणि विद्यार्थी विभाग प्रभारी चेतन पेडणेकर यांनी दिली आहे. थेट निवडणुकीत प्रत्येक विद्यार्थ्याकडून मतदान केल्या कारणाने दबाव किंवा अपहरणांसारखा बेकायदेशीर प्रकार करण्यास वाव मिळणार नाही पेडणेकर याकडे पेडणेकर यांनी लक्ष वेधले आहे.या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य सरचिटणीस मिलिंद गावस  यांनी केले.  युवा विभागाचे प्रभारी सचिव अमोल प्रभुगावकर,  विद्यार्थी विभागाचे प्रभारी तथा युवा संघटक चेतन पेडणेकर आणि इतर विद्यार्थी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.