विद्यापीठाच्या निवडणुका 15 दिवसात जाहीर न झाल्यास विद्यापीठावर मोर्चा:शिवसेना विद्यार्थी विभागाचा इशारा

0
1035
गोवा खबर:गोवा विद्यापीठाच्या निवडणुका 15 दिवसाच्या आत जाहीर न केल्यास विद्यापीठावर मोर्चा काढला जाईल,असा इशारा शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाने दिला आहे.
गोवा विद्यापिठात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.मात्र शिक्षण खाते  त्याकडे दुलर्क्ष करत आहे.  दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये गोवा विद्यापिठाचा निवडणूका होत असतात पण यावर्षी जाणून बुजून उशीर केला जाता आहे,असा आरोप करतानाच विद्यापिठाने 15 दिवसांच्या आत निवडणूका जाहीर कराव्या अन्यथा शिवसेनाच्या विद्यार्थी विभागातर्फे विद्यापिठावर मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा शिवसेना युवा संघटनेचे अध्यक्ष चेतन पेडणेकर याने दिला आहे.
 गोवा विद्यापिठातील डीएसडब्लू सेवा अनेक दिवसांपासून बंद आहे. या नंबरवर फोन केल्यावर लागत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडता येत नाही. विद्यार्थ्याच्या समस्या सोडवण्यासाठी  ही सेवा सुरु केली होती ती बंद आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणीही यावळी शिवसेना युवा संघटनेतर्फे करण्यात आली.
 शिवसेनामध्ये मोठय़ा प्रमाणात आता युवक सहभागी होत असून सर्वासाठी पक्ष खुला आहे. विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 अक्षता नाईक हीला यावेळी शिवसेना युवा संघटनेत प्रवेश देण्यात आला. यावेळी शिवसेना युवा संघटनेच्या सचिव मंथन रंकाळे, नेहारिका कामत,अक्षदा नाईक संकेत कुडतरकर व आश्विनी शेट्ये उपस्थित होते.