वित्तीय समावेशनाचा भाग म्हणून वित्त मंत्रालयाकडून “जन धन रक्षक” मोबाईल ॲपचे उद्‌घाटन

0
2226

 

गोवा खबर:केंद्रीय वित्त मंत्रालयवित्तीय सेवा विभाग आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी संयुक्तरित्या सर्वसामान्य नागरिकांसाठी “जन धन रक्षकनावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. सरकारच्या वित्तीय समावेशनाचा भाग म्हणूनजनतेला आर्थिक सुविधांची माहिती देण्यासाठीहे ॲप सुरु करण्यात आले आहे.

या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सर्व बँका आणि वित्तीय सेवांची माहिती जनतेला त्यांच्या मोबाईलवर हव्या त्या ठिकाणी मिळू शकेल. “ग्राहक-केंद्री” अशा या ॲपवर बँकापोस्ट ऑफिससी एस सी अशा सर्व संस्थांची माहिती आणि त्यांचे स्थळ मिळू शकेल. जनतेच्या गरजा आणि सोयींनुसार या ॲपचा वापर करता येईल.

ग्राहकाच्या जागेपासून जवळ असणाऱ्या वित्तीय सेवा जसे एटीएमपोस्ट ऑफिसबँक शाखा यावर कळू शकतील. बँकांच्या विविध शाखांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असतीलशिवाय त्यावरुन बँकांशी थेट संपर्कही साधता येईल.

ग्राहकांनी यावर दिलेला प्रतिसादतक्रारी थेट संबंधित वित्तीय संस्थांकडे जातीलजेणेकरुन त्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करता येतील.