विठ्ठलापूर नौकायन स्पर्धेत यंदा इको फ्रेन्डली नौका

0
563

गोवा खबर:राज्यस्तरिय त्रिपूरारी पौर्णिमा उत्सव समिती-२०१९ ची बैठक कला आणि सांस्कृतिमंत्री श्री. गोविंद गावडे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष तथा मांद्रेचे आमदार श्री दयानंद सोपटे उपस्थित होते.

बैठकीत राज्यस्तरीय उत्सव आयोजनासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्रिपूरारी पौर्णिमा उत्सवाचे आकर्षण ठरणाऱ्या नौकायन स्पर्धेत यंदा स्पर्धाकांकडून भरीव प्रतिसादाची अपेक्षा असून इको फ्रेन्डली नौकानाच स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. थर्माकोल आणि प्लास्टीकचा वापर करण्यात आलेल्या नौकांचा विचार स्पर्धेसाठी होणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगून कला व सांस्कृतिकमंत्री श्री गावडे म्हणाले निसर्गाला बाधक ठरणाऱ्या गोष्टीपासून जनतेने  दूर रहाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाची स्पर्धा ही इको फ्रेन्डली असणार असल्याने गतसाली आयोजकांनी स्पर्धेच्यावेळी जाहिर केले होते त्यानुसार इको फ्रॅन्डली नौकानाच स्पर्धेत प्रवेश देण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीला कला व सांस्कृतिक खात्याचे सचिव श्री चोखाराम गर्ग, माहिती खात्याचे संचालक श्रीमती मेघना शेटगांवकर, कला व सांस्कृतिक खात्याचे उपसंचालक श्री अशोक परब, कारापूर सर्वण पंचायतीच्या सरपंच सौ. सुषमा सावंत, सांखळी नगरपालिकेचे मुक्याधिकारी श्री प्रविंजय पंडित व इतर सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची पुढील रूपरेशा ठरविण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी विठ्ठलापूर साखळी येथे स्पर्धेठिकाणी दुसरी बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी आयोजनासंबंधी सविस्तर चर्चा होणार आहे.

स्पर्धकांनी आधिक माहितीसाठी दिपावली समितीचे  अध्यक्ष श्री. अरूण नाईक यांच्यशी संपर्क साधावा.